जुन्या नव्या गोष्टीतील पात्रे …
जिवंत होऊन जणू बोलती …
गाव पुस्तकामधील सुंदर
जुनीच चित्रे रंगवणारे…..
निळसर अंबर धम्मक कविता…
पिवळ्या हळदी अजून झुलती…
दिवस सुगीचे ओला चारा..
गोठ्यामधली नंदा कपिला..
ऊन कोवळे पिवळे तांबूस ..
शेत साळीचे श्रावण झूला …..
अहमद लीला..यास्मिन सीता …
कृष्णाचा गोपाळ राखतो…
अजून गाई पाण्यावरच्या …
मन्नो दीदी गावी येते.. जीप घेऊनी ..
किती भावतो लाल मलमली..
तिचा दुपट्टा तरंगणारा…
अंकलिपी अन मुळाक्षरांची
सान पुस्तिका …
चिमा कामसू …दिवा घासते..
बडबड गीते ..झ झबल्याचा..
शिवणकाम इतिहास कलेचा…
किती किती अन काय आठवू..
आठवले ते सारे सारे…
संगणकावर टिपून ठेवू…