लकी वार तारीख ही
निळी जिन खिशाची वही
खिसा मी कशाला शिवू
जुळे तो चिकटवूनही
हळू मोज मात्रा बरे
लगागा करूनी सही
कलश शुक्रवारी कनक
करू कार्य तेरासही
जगा आणि जगवा जिवा
क्षमाशील आहे मही
गझल मैत्र मैत्री जिथे
तिथे काव्य तरल तरही
उखड अंधश्रद्धा पुऱ्या
मुखी घाल साखर दही
लिहावीच बाराखडी
हु हू हो हि हौ हं ह ही
पटेना सुनेत्रा तयां
म्हणे ठाम नाही नही