चला तुतारी फुंकू आपण
सत्त्वर त्यागू मीपण बीपण
मिथ्यात्वावर घालूया घण
काव्य तुतारी फुंकू आपण ओठांनी अपुल्या
अंतरीचा आवाज उमटूदे काव्यातून अपुल्या
मशाल पलिते धरू पेटते
दीपस्तंभ ते काव्यपथाचे
अखंड चळवळ हात राबते
ओंजळ ओंजळ प्रेम सांडुदे हातातून अपुल्या
अंतरीचा आवाज उमटूदे काव्यातून अपुल्या
जीव जपावा वत्सल भावे
नकोच ईर्षा हेवेदावे
स्वाध्यायाने गुण उजळावे
दहशत हिंसा पळवून लावू कृतीतूनअपुल्या
अंतरीचा आवाज उमटूदे काव्यातून अपुल्या