-
जलद तोटी – JALAD TOTEE (tap of cloud)
कश्शाला पाऊस पडेल सांगा कशाला पाऊस पडेल बाई हृदय भरून येतच न्हाई वाऱ्याची झुळूक चुंबत नाही सच्छिद्र देह झरत नाही डोळ्यात आसवे भरत नाही पापण दले हलत नाही पाऊस थेंब पडत नाही लिहीग सई काहीबाही लिहित रहा मंगल गाणी दवाच्या बिंदूंचे साठव पाणी मिसळ त्यात गारांचे पाणी बुडव तयात मातीचे हात सारव तयांनी अंगण गात…
-
उनाड – UNAAD (vegabond)
-
बोला आता खरे खरे – BOLAA AATAA KHARE KHARE (now speak the absolute truth)
मुदत संपली लपवायाची बोला आता खरे खरे सांगुन सांगुन दमलो चिडलो सत्यच सांगा खरे खरे कशास केली लपवाछपवी भले कुणाचे करावया अता न कुठली वाट तुम्हाला इकडे तिकडे पळावया चारित्र्याचा मिरवित तोरा फिरला तुम्ही इथे तिथे चारित्र्याची ‘असली’ व्याख्या तुम्हा कळाली कधी कुठे भ्रमात भिजवुन बुद्धी अपुली काय जाहले जीवाचे अहंकार अन हवस मनाची लाड…
-
बदाम आंबा – BADAAM AAMBAA (heart shaped mango)
चोखुन चोखुन आंबा खा चवीत पुरता बुडून जा आंबा आहे भलता गोड त्याच्याशी तू नाते जोड कर योगा अन होना रोड नाद जीमचा आता सोड नकोस ठेवू भीड नि भाड मुजोरड्यांना पाडच पाड पाण्यामध्ये होडी सोड पुरव जिवाचे कौतुककोड होशील आता मालामाल हंसासम डौलाने चाल नको घाबरू वळणांना वळणावरच्या थांब्यांना हवा कशाला तुज थांबा तू…
-
ट चे गाणे – TA CHE GAANE (song of letter T)
-
गीत – GEET (song)
-
चित्र रेखाटिता – CHITR REKHAATITAA (when I draw a picture)
चित्र रेखाटिता हरित पावलांनी नाव ही रेखिले मृदेच्या कणांनी उच्छवासापरी धुराडे चुलीचे ओकते काजळी भरोनी ढगांनी आरसा पाहुनी नटावे सजावे स्वप्न डोळ्यातले गुलाबी क्षणांनी गंध मातीतला मिळाला हवेला शिंपिता अंगणी सडा या घनांनी लागले भृंगहे इथे ते घुमाया काव्य शाकारता कळ्यांनी फुलांनी वृत्त – गा ल गा, गा ल गा, ल गा गा, ल गा…