-
हे तर सोने – HE TAR SONE
मुस्तजाद गझल म्हणती कोणी ! फतरी पाने ! हे तर सोने !! मधुघट भरला ! शांत रसाने ! हे तर सोने ! तपली भिजली ! अबला कसली ! बलाच असली ! भर गाभारा ! मृदगंधाने ! हे तर सोने ! गजबज तारे ! अवस अंबरी ! पुनव अंतरी ! घे टिप संधी ! शर संधाने…
-
शांत रस – SHAANT RAS
मौन ते बोलते जे सले टाळते भावना प्रकटते जादुई गाव ते गझल दल उमलते वाजती चाळ ते चांदणे गाळते रंगले वर्ण ते काफिया माळते गाल गा गाजते शांत रस पाजते
-
दीप दीप – DEEP DEEP
दीप दीप लक्ष दीप तेवतात शांत दीप चंद्र शुक्र गगन दीप देह चैत्य आत्म दीप अंतरात लाव दीप गझल वात भाव दीप मम सुनेत्र दोन दीप
-
कारण – KAARAN
कारण चपखल रुतते आहे कारण त्याचे सलते आहे शब्द चोरटे गाली हसता कारण नकळत फिरते आहे चोरांच्या उलट्या बोंबांनी कारण तिळतिळ तुटते आहे फुलवायल वा असो पैठणी कारण वरवर चढते आहे पुफ्फ सुगंधी दरवळणारे कारण सौरभ झरते आहे मधमाशीसम बछड्यांसाठी कारण कारण लढते आहे घुम्या वेदना घुमत राहती कारण पुरुनी उरते आहे भरून पिंडी आनंदाश्रू…
-
पैठणी – PAITHANI
हलकी फुलकी नवी पैठणी स्वाभिमान जागवी पैठणी किणकिण मंजुळ नाजुक घंटा सोळाकारण हवी पैठणी रत्नत्रय धन जिनानुयायी कूळ मिरविते कवी पैठणी गवळण गरगर करात फिरवत मंथन करते रवी पैठणी मोरपिशी इरकली वहीवर कुसुमांकित माधवी पैठणी कवयित्री क्षत्राणी नारी मृदुल पात पालवी पैठणी पहाटवाऱ्याने सळसळते भिजते सुकते दवी पैठणी
-
स्तुती-STUTEE
कशास काढू उणीदुणी मीकशास नसती धुवू धुणी मी लगावली मृदु लगालगागाकशास झिंगू झिनी झिणी मी जिनालयांचे कळस पहातेकशास चक्रे न सर्पिणी मी कुलूप किल्ल्या करास माझ्याकशास धुंडू तयां खणी मी सुनेत्र माझे सुवर्ण सम्यककशास गुंतू सरळ फणी मी कुरण हवेली दवारलेलीकशास झाडू कुडा रणी मी स्तुती जिनांची लिहू सुनेत्राकशास मिथ्या विणू विणी मी
-
क्लीक – CLICK
कशास करु मी क्लीक कुठेहीछायचित्रे मिळवाया…प्रसन्न साकी माझ्यावरतीसृष्टी सुंदर दावाया….कशास फोटो पाहू आतातूच ठाकता पुढ्यात रे…ओढ निसर्गा तुझीच मजलातुझ्या मनाचा फोटो दे…. मित्र सखा अन ईश्वर गुरु पणनिसर्ग आहे मनुजाचा …हवीच साकी जिनवाणी ममस्फुरण्यासाठी काव्याला … मला न चिंता भीती कसलीनिसर्ग देवा तुझ्यासवे…अंतरीचा जिनदेव दाखवीबिंब मनोहर तुझे खरे … सूर्योदय सूर्यास्त पाहतेरोज तरीपण नवा नवा…