-
तुळस मोगरा – TULHAS MOGARAA
ठेवू कोठे तुळस मोगरा गच्च दाटला हरित कोपरा काव्य बहरले पान-फुलांनी सैल जाहला देह चेहरा बैल उधळतिल हातामध्ये धरून ठेव तू घट्ट कासरा शेवटचे दिस गोड व्हावया हळू हळू थांबतो भोवरा मधुर फळांची बाग शिंपण्या आडामध्ये जाय पोहरा सुखी जाहली माझी बाळे ऐकव गझला अता शायरा चढून जाऊ डौलामध्ये वळणदार हा मस्त दादरा
-
मला सापडे ती – MALAA SAAPADE TEE
कळाया नव्याने मला सापडे ती सदा घोळ घाले तरी आवडे ती किती नाक अपरे नयन नीलकांती जणू बाहुली बोलते बोबडे ती तुझी बायको तिज कसे मी म्हणावे कधी सारवीते तुझे झोपडे ती तुला तीट लावे तुझी दृष्ट काढे तुला घालते अंगडे टोपडे ती बटा स्वैर उडता कुरळ कुंतलाच्या तया तेल भारीतले चोपडे ती जरी अर्घ्य…
-
ठेला – THELAA
कविता मम शब्दांचा झेला रंगवून तिज घे शेजेला रम्य कल्पना खुले कागदी चित्रासम संध्येची बेला स्वातीचा शिंपला मनोरम अगणित पानांचा जणु ठेला शिवगंगा धरणीवर आली माळ जयश्री तृणबालेला घटिका मंगल जवळी आली घे मीना अंगावर शेला मात्रावृत्त – ८+८= १६ मात्रा
-
पाऊस पडतोय मुसळधार – PAAOOS PADATOY MUSALHDHAAR
पाऊस पडतोय मुसळधार हवा मस्त गारेगार वेड्या पावसा थांब रे माझ्या घरी ये रे स्वच्छ पंचा माझा घेऊन चिंब मन काढ पुसून आरामखुर्चीत माझ्या बस माझ्याकडे पाहून हस वाफाळलेला चहा घेत गप्पा मारू मजेमजेत भविष्याची चिंता सोड हृदयापासून नाती जोड भविष्य सांगतोय कुडमुड्या त्याला सांग नको उड्या जोहड धरणात धबाब रे दरवाजातून फुसांड रे पाणी…
-
बाई बाई – BAAEE BAAEE
मुक्तक लिहुकी गझल रुबाई म्हणू पाळणा की अंगाई नाव फुला तुज कुठले देऊ गुलबक्षी की चंपक जाई आतुन आतुन उचंबळे कढ अश्रू टिपण्या नकोच घाई पणती ठेऊ तुळशीपाशी परतुन येता गुरे नि गाई गोरज समयी धूळ रंगते सूर्यास्ताची ही नवलाई मनात काहूर हृदयी हुरहुर आठवती दादा अन आई खट्याळ वारा पदर उडवितो शीळ घालुनी बाई…
-
आम्ही हातांना खूप खूप जपतो – AAMHEE HAATAANNAA KHUP KHUP JAPATO
एकदा मला एक जातीयवादी व्यक्ती भेटली. तिने मला विचारले “तुझी जात कोणती”? मी म्हणाले, “माझी जात बाईची”? मग तिने मला विचारले, “तुझा धर्म कोणता”? मी म्हणाले, “माझा धर्म आत्मधर्म”. तिने विचारले, “या धर्माचे सार काय”? मी म्हणाले, “या धर्मात आम्ही लोक, आत्म्यावर श्रद्धा ठेवतो आणि मनगटाच्या बळावर विश्वास ठेवतो. हातावरच्या रेषा आपल्याला हव्या तेवढ्याच आणि…
-
कल्पनेने शोध घ्यावे – KALPANENE SHODH GHYAVE
कल्पनेने शोध घ्यावे आजही मोहनेने मोहरावे आजही कंचनी काया फुलांची मोहरे ज्योतिने ते रंग प्यावे आजही सोनियाच्या दागिन्यांना घालुनी वल्लरीने बागडावे आजही केतकीने माखुनी हळदी उन्हा सौरभाने फ़ुलुन यावे आजही रेखुनी नयनात काजळ रेषिका अनुपमेने मुक्त गावे आजही मंजिरी वृन्दावनी या विखुरल्या मृण्मयीने बीज ल्यावे आजही बासरी चित्रात घुमते का तरी अलकनंदे तू झुरावे आजही…