Category: Marathi kaavya

  • कोण पऱ्यांना – KON PARYAANNAA

    कोण पऱ्यांना अमुच्या सुंदर आवडती सुकुमार… शोधुन काढू पिंजुन विश्वा शूर असे सरदार… मधुबालेसम नाजुक कन्या कुणी न स्पर्धक त्यांच्या पुण्या गुढी उभारुन त्या सत्याची उलथतील सरकार… ऐनकातुनी रोखुन बघती कपट जाळती मधुर हासती शोभुन दिसती तळपुन उठती जणू करी तलवार… अहंपणाचा अर्थ न ‘मी’ पण तू तू तू तू नसते शिकवण उपजत प्रीती तिरकस…

  • आली मंगल घटिका खरी – AALEE MANGAL GHATIKAA KHAREE

    दवबिंदूंनी घट भरला अन थरथरली बासरी…आली मंगल घटिका खरी … वेदीवरती प्रभू तीर्थंकर कुंजवनी पक्ष्यांचे सुस्वर भारद्वाज नि कोकिळ गाती झुळूक फिरे नाचरी… आली मंगल घटिका खरी… लता माधवी मुग्ध वल्लरी उभ्या घेउनी पुष्प-आरती निसर्ग ओते या पृथ्वीवर सौख्याच्या घागरी… आली मंगल घटिका खरी … पुनव चांदणे ऋद्धी सिद्धी भिजे चांदणी कुलीन बुद्धी वीज चमकते…

  • वरण भात जरि – VARAN BHAAT JARI

    वरण भात जरि त्यास आवडे ताक कण्या तिज आवडती जात्यावर ती ज्वारी भरडे ताक कण्या तिज आवडती तोलुन मापुन तो खातो पण हवे तेवढे खाते ती बाथ घेतसे टबामधे तो शुभ्र प्रपाती न्हाते ती भाताने बघ वजन वाढते नकोच खाऊ म्हणते ती जिमला जावे तो म्हणतो तर फिरण्या जाऊ म्हणते ती तो म्हणतो तिज प्रीत…

  • मी उभी कमळात – MEE UBHEE KAMALHAAT

    मी उभी कमळात सुंदर ओंजळी भरभरुन देण्या वाहणारी नीर धारा घागरी भरभरुन देण्या अंगणी धनधान्य सांडे अंबरातिल चांदण्यांसम हात दोन्ही सज्ज माझे पोतडी भरभरुन देण्या रेखिते मी काव्यचित्रे कृष्णवर्णी मौक्तिकांनी भावभरली शब्दसुमने टोकरी भरभरुन देण्या मी वडाचे बीज इवले भूवरी उगवून येते बहरते मी पसरते मी सावली भरभरुन देण्या अचुक तोले मी ‘सुनेत्रा’ खास असुनी…

  • येतात घरी हे जेव्हा – YETAAT GHAREE HE JEVHAA

    संदीप खरे यांच्या नसतेस घरी तू जेव्हा’ या सुंदर भावपूर्ण कवितेवर हे सहज सुचलेले विडंबन नसतात घरी हे जेव्हा… मी चॅटींग करीत बसते दाराशी चाहूल ह्यांची मी त्वरीत ऑफलाईन होते येतात घरी हे जेव्हा… मग जेव्हा वाजे बेल अंतरी साठवित बोल मोबाइल मौनी होतो मी हसून उघडे दार येतात घरी हे जेव्हा … सय मला…

  • खूप मस्त – KHOOP MAST

    खूप मस्त मस्त वाटतंय देह वस्त्र चुस्त वाटतंय देणं घेणं संपल्यावरच केलं सारं फस्त वाटतंय उरलं सुरलं देत आप-धन बरसतोय हस्त वाटतंय रागरंग ओळखतच मन घालतेय गस्त वाटतंय मेघ दाटलेत गगनभर विश्व अवघं सुस्त वाटतंय आम आदमीच फक्त इथं लावणार शिस्त वाटतंय का बरे कुणास आजपण काव्य माझं स्वस्त वाटतंय अक्षरगण वृत्त (मात्रा १४) लगावली…

  • हृदयी माझ्या – HRUDAYEE MAAZYAA

    हृदयी माझ्या फूल उमलते नित्य गुलाबाचे म्हणून जपते दवा बाटली पथ्य गुलाबाचे मिटून डोळे मौनामध्ये गझल चुंबिताना पापण काठी झुले गुलाबी सत्य गुलाबाचे व्यथा प्रीतिची प्राशुन मदिरा नशेत असताना अश्रू होउन झरते गाली शल्य गुलाबाचे आधी मैत्री नंतर प्रीती हेच खरे जाणा म्हणून असते काट्यांशीही सख्य गुलाबाचे गुलाबपुष्पे रंगबिरंगी दूर प्रिय चालली तुझे चोरुनी हृदय…