-
चहा हवा मज – CHAHAA HAVAA MAJ
चहा हवा मज मैत्रीसाठी कॉफी पण तव प्रीतीसाठी दुधात केशर काडी नाजुक घालू साखर गोडीसाठी बोलायाचे असूनसुद्धा कुणीच का रे बोलत नव्हते अधरामधले शब्द नेमके कोणासाठी अडले होते गप्पागोष्टी इतुक्या केल्या व्यक्त व्हायचे जमले नाही एकांतातिल माझी स्वप्ने अतीव सुंदर कळले नाही प्रश्न केवढे आणिक मोठे तरी न उत्तर कुणास पुसले एकलीच मी उकलत बसले…
-
हृदय माझं सजलं आहे – HRUDAY MAZA SAJALA AAHE
हृदय माझं सजलं आहे आनंदानं भरलं आहे म्हणून लिहिते गाणी मी खळाळणारं पाणी मी पाण्या पाण्या वाहत जा मातीला तू भिजवित जा माती माती हसत रहा अंकुरांनी फुलत रहा किरणे झरतिल झर झर झर अंकुर वाढे सर सर सर झाड होईल डेरेदार बसू सावलीत गारेगार नवे वर्ष नवी हवा निळ्या खगांचा नभी थवा रंग प्रीतिचा…
-
पाहते का अशी – PAAHATE KAA ASHEE
पाहते का अशी मज गझल रोखुनी चूक शोधू नको वृत्त हे स्त्रग्विणी तीक्ष्ण दृष्टी मला लाभता तव कृपे काफिये मी असे निवडते चाळुनी मोकळे ढाकळे बोलुया भांडुया हेच मी सांगते संयमी राहुनी गुंफिते शब्द मी शुभ्र हे शारदे चरण तव स्पर्शिते लीन मी होउनी ज्ञानधारा खिरे सूक्ष्म छिद्रातुनी चिंब मज व्हायचे या जली न्हाउनी स्त्रग्विणी…
-
तापता गोठता – TAAPATAA GOTHATAA
तापता गोठता अंबरी पीर हे मेघमालेतुनी बरसले नीर हे वारियाने उडे पल्लवी तीक्ष्ण ही माधवी वल्लरी उधळिते तीर हे हारणे ना अता ध्यास हा लागता जिंकण्या त्यागिती मीपणा वीर हे पूर्ण तो चंद्रमा हासता विहरता सांडते भूवरी चांदणी क्षीर हे रक्षिण्या मायभू बांधवा आपुल्या सोडुनी शत्रुता ठाकले मीर हे चूक मम व्हावया खूप घाई नडे…
-
माय माझी – MAAY MAAZEE
माय माझी अता रे कुठे राहते कोण सांगेल मज नव तिचे नाव ते स्वप्न मी पाहते झोपता जागता बालिका होउनी गोड ती हासते नाचते खेळते ती परी होउनी अंगडे टोपडे घालुनी झोपते तिजसवे बोलण्या गीत मी लिहितसे मायबापा तिच्या पत्र मी धाडते म्हणतसे कोण मज ही पुरी नाटके नाटकी माणसे मी अशी टाळते Ghazal in…
-
रंगलेल्या नभी – RANGLELYAA NABHEE
रंगलेल्या नभी सूर्य नारायणा अर्घ्य देण्या तुला ताठ माझा कणा पेल हाती ध्वजा लाव कळसावरी शुद्ध आहे तुझी भावना धारणा साठलेले जळी प्रेम गंधाळले उघड आता खऱ्या अंतरीच्या खणा सर्प मित्रांसवे केतकीच्या बनी नाग चिंतामणी डोलवीती फणा वाहिले तू पुरे काव्य हृदयातले उपट डोक्यातल्या माजलेल्या तणा पुस्तके वाचुनी लेक झाली गुणी लोकगीते तिची रेशमी झोळणा…
-
स्रग्विणी वृत्त जाणायचे – STRGVINEE VRUTT JAANAAYACHE
स्रग्विणी वृत्त जाणायचे आज तू गालगा चारदा गायचे आज तू गालगा गालगा गालगा गालगा हे लगावून वाचायचे आज तू गालगागा लगा गाल गागालगा वेगळे सूर ही द्यायचे आज तू गाल गागालगा गालगागा लगा यातही कोंबुनी घ्यायचे आज तू मी ‘सुनेत्रा’ मला ना यशाची नशा चिंब प्रेमामधे न्हायचे आज तू स्त्रग्विणी (अक्षरगणवॄत्त) लगावलीः गालगा गालगा गालगा…