-
मजबूत – MAJBUT
कशास रे होडी हवी हात पाय मजबूतमोठे विक्राळ सागर केले पोहून मी पार माझ्या हृदयी कंदील ज्योत त्याची तेवणारीत्याच्या प्रकाशात पीत निळा समुद्र पेलला सारेगमपधनीसा सूर लागले गगनीलाल पेटले अंबर घन काळे गोठवूनी कुठे कुणी कसे कोण काय प्रश्न कुंडलीचेअश्या कुंडलीचे प्रश्न चुलीलाच भरवले माझ्या माजी कुंडल्यांची राख खाक झाली आजराखेचे त्या उटणे मी आज…
-
अंगी – ANGEE
कपड्यांची ना तंगी ओळखकट्यार लखलख नंगी ओळख समोर डोंगर जमाल बाबूरम्य कुटी मम जंगी ओळख गिरिबाळांचे स्नान जाहलेमृदुल पोपटी अंगी ओळख अनेकान्त शैली स्याद्वादीधारा सप्तम भंगी ओळख भद्र भाव घन कळस चुंबितीश्वासांची नवरंगी ओळख
-
प्रार्थना – PRARTHANA
रक्षण जीवांचे करणारी जीवातील करुणादया दान वात्सल्यभावयुत जीवातील करुणामुक्त जीव जाणती पाहती करुणाभावे जगासम्हणुनी प्रार्थनी जीव विनवती रक्षाया जीवास
-
परमेष्ठि – PARMESHTHI
व्हॉटसॅपचे डोके आणिक, फेसबुकची काठी..क्षमा मार्दवाची मम हाती, एक कलमी लाठी. धरा हवा अन जलधारा, दहा दिशा गातातदशलक्षण धर्माचे नाणे, खणखणतेय गाठी. आर्जव शुचिता सत्य संयमे,अहितकर त्यागाया..अकिंचन्य अन ब्रह्मचर्य ही,असूदे परिपाठी. क्षमावणीला पर्व समाप्ती,त्यागु शंका-शंका..धर्म अहिंसक मर्म जाणतो,वर्म बुद्धी नाठी.. फेसबुकची तोलाया विटी,व्हॉटसपचा दांडू..पर्यूषण पर्वातिल लोपी, पूज्य माझिया पाठी.. ईश्वर अल्ला सिद्ध जिनेश्वर,अणु रेणु परमाणुत..फिरे…
-
मंत्र णमो
पावसात न्हात गात चिंब चिम्ब भिजणारचओलेत्या वस्त्रांना हलके मी पिळणारच वाऱ्यावर स्वार होत आभाळी फिरणारचक्षमा मार्दवात धर्म आर्जवास मिळणारच धो धो धो धबधब्यात शुचिता मम हसणारचटपटपत्या वसनांतुन नीर क्षीर झरणारच सत्याला भिजवाया पळापळी करणारचएक मूळ खोड जुने कर्माने जळणारच खाक होत राख होत पाण्याला मिळणारचउपजत मम संयम बघ उन्हामधे तपणारच कृष्णमेघ हळूहळू झेप घेत उडणारचत्यागुनिया…
-
फूड – FOOD
चवदावे रत्न …. सुबक ठेंगणी वय चवदाची गझल देखणी सय चवदाची रत्न रुबाई हे चवदावे बाईपण मम मजला भावे … बटुव्याची खीर…. मी कणिक तिंबुनी गोळा केला बाई … अन हात चोळले हातावरती बाई… पाऊस बरसता बटुव्यांचा झरझरा … कढईत बटुवे भरले मग भरभरा … ठेवुनी चुलीवर केली विचारपूस … साजूक तुपावर परतून ते खरपूस…
-
चिती – CHITEE
धांगडधिंगा किती पावसा सांग असाका अती पावसा वेड तुला का असे लागले फिरलीका तव मती पावसा झाड वडाचे तुझ्या काननी पाव म्हणे तुज सती पावसा धार खरी कापण्या भिजवण्या घे पवनासम गती पावसा घनफळ बिनफळ तुझे मोजण्या कुठली आणू चिती पावसा