-
रंगत गेल्या पुन्हा मैफिली – RANGAT GELYAA PUNHAA MAIFILEE
रंगत गेल्या पुन्हा मैफिली दूर जरी तू माझ्यापासुन माथ्यावरती तुझी सावली दूर जरी तू माझ्यापासुन रखरखणाऱ्या उन्हातसुद्धा छायेमध्ये तुझिया आई भिजली पाने सर्व चाळली दूर जरी तू माझ्यापासुन भेट न आता प्रत्यक्षातिल ठाउक आहे म्हणून मी तव फोटोमधली छबी वाचली दूर जरी तू माझ्यापासुन करुणामय दो नयनांमधुनी फक्त प्रेम अन प्रेमच बरसे हाच दुवा अन…
-
आठवते मज – AATHAVATE MAJ
-
वळण – VALHAN
-
बोल मना – BOL MANAA
-
चहा हवा मज – CHAHAA HAVAA MAJ
चहा हवा मज मैत्रीसाठी कॉफी पण तव प्रीतीसाठी दुधात केशर काडी नाजुक घालू साखर गोडीसाठी बोलायाचे असूनसुद्धा कुणीच का रे बोलत नव्हते अधरामधले शब्द नेमके कोणासाठी अडले होते गप्पागोष्टी इतुक्या केल्या व्यक्त व्हायचे जमले नाही एकांतातिल माझी स्वप्ने अतीव सुंदर कळले नाही प्रश्न केवढे आणिक मोठे तरी न उत्तर कुणास पुसले एकलीच मी उकलत बसले…
-
हृदय माझं सजलं आहे – HRUDAY MAZA SAJALA AAHE
-
पाहते का अशी – PAAHATE KAA ASHEE
पाहते का अशी मज गझल रोखुनी चूक शोधू नको वृत्त हे स्त्रग्विणी तीक्ष्ण दृष्टी मला लाभता तव कृपे काफिये मी असे निवडते चाळुनी मोकळे ढाकळे बोलुया भांडुया हेच मी सांगते संयमी राहुनी गुंफिते शब्द मी शुभ्र हे शारदे चरण तव स्पर्शिते लीन मी होउनी ज्ञानधारा खिरे सूक्ष्म छिद्रातुनी चिंब मज व्हायचे या जली न्हाउनी स्त्रग्विणी…