Category: Marathi kaavya

  • गुड-गुड गाणी – GUD-GUD GAANEE

    पहाट गाणे पाखरू  गाते वाटिका प्रभाती दवात न्हाते चिवचिव किलबिल गुडगुड गाणी खळखळ झरझर वाहते पाणी डोलते नाचते तृणाचे पाते… गप्पा अन गोष्टी कराया नित्य हसत खेळत बोलावे  सत्य जपावे सुंदर चहाचे नाते … झुळूक हवेची घरात यावी सुगंधी लहर नाकाने प्यावी गरगर फिरवित दगडी जाते … उप्पीट शिरा लोणचे खावे उदरभरण मज्जेत करावे अंगणी…

  • नारळ नटखट – NAARAL NATKHAT

    तांब्यावर पानांची महिरप हळदीकुंकू टिकल्या मळवट प्याल्यामध्ये लिंबू सरबत चाले लगबग कसले खलबत पायापाशी जळी मृदुल कण आतिथ्याने नटले क्षणक्षण ओटीमधला नारळ नटखट जयात लपले कोडे अनवट जांभुळवर्णी वसन गडद खण त्यात बांधुनी दिले सजल घन

  • कृष्णामाई – KRUSHNAA MAAEE

    श्रुत-पंचमीच्या दिनी जीव वाजे झिनीझिणी पुष्पदंत भूतबली दर्शनात मग्न कळी निरांजन माझ्या हाती पंचप्राण माझे गाती आदिनाथ जिनेश्वर मुक्त शांत कैलासावर सिद्धशिला प्राप्त करुनी वीस जिन सम्मेदावर वासुपुज्य चंपापुरी तीच त्यांची मुक्तीगिरी गिरणारी नेमीनाथ मस्त घाट मोक्षपाथ महावीर पावापुरी रम्य शुद्ध मुक्ती खरी कोपरा तो पाकघरी तीर्थंकर वेदीवरी मंदिरात आत्मज्योत तीच कृष्णामाई स्त्रोत

  • व्हेज चीलिमिलि – VEG CHILIMILY

    भरेल हंडी काठोकाठ उरेल तरिहि सुंदर लाट चिक्कू द्राक्षे बदाम गोड नटले मम पूजेचे ताट नकाच पाळू आता बंद खरेपणाने चाला घाट नाही आहे सर्वच छान करा सांडगे मांडा पाट व्हेज चीलिमिलि खाऊयात कवयित्री मी बनवी चाट

  • जैन गझल – JAIN GAZAL

    जितुकी सोपी तितुकी अवघड आहे माझी जैन गझल हिमशिखरावर जाऊन बसली सदैव ताजी जैन गझल आहे हट्टी अवखळ पागल पिसे तिला मम वेडाचे वेडासाठी प्राण त्यागण्या होते राजी जैन गझल साधक श्रावक जैन अजैनी पंडित मुल्ला गुरवांच्या नकळत हृदयी थेट शिरोनी मारे बाजी जैन गझल मिष्टान्नावर ताव मारण्या बसता सारे मधुमेही त्यांना वाढे जांभुळ अन…

  • कूप-मंडुक – KOOP-MANDUK

    कूप माझे विश्व अवघे रूप मंडुक पिंड माझा मी कुपातुन ब्रम्ह बघते नीर प्राशुन तृप्त होते चार ओळी मुक्त माझ्या नाव त्याला काय देऊ गा ल गा गा ना र ना ना राधिकेला काय सांगू कृष्णलीला रामलीला कैक लिहिल्या कैक झाल्या लपुन बसला  मोक्ष कोठे पाखराला ज्ञात नाही पिंजऱ्याला फोड प्राण्या पाखराला मुक्त करण्या  

  • मानी – MAANEE

    म्हणशिल तू जर लिहिन कहाणी कारण मीही आहे मानी येशिल जेव्हा उकलुन गाठी देइन तुजला साखरपाणी वैशाखाने आज शिंपली सुगंधजलयुत गुलाबदाणी मृद्गंधाची धूळ टिपाया हृदयी माझ्या अत्तरदाणी मौन प्राशुनी तृप्त जाहली फुलली हसली खुलली वाणी मृदुल कोवळ्या शशिकिरणांची माधुर्याने भिजली वाणी मनात शुद्धी खरी असूदे दिवानी वा लिही दिवाणी प्रेमासाठी मत्सर प्याले वेडी म्हण वा…