-
तिरंगा – TIRANGAA
अधरांवरती असेल शिट्टी हातामध्ये घड्याळ झाडू अचूक समयी भारतभूवर भ्रष्टाचारा उखडू जाळू खांद्यावरती धनुष शिवाचे भात्यामध्ये बाण अक्षरी हृदयमंदिरी सदा तिरंगा हीच असूदे सही स्वाक्षरी तळ्यात कमळे बघत धावते इंजिन पाठी झुकझुक गाडी दिडदा दिडदा गात फुलविते शेतमळे अन हिरवी झाडी स्वार्थांधांना धूळ चारण्या मानव सारे एक होउया जीव शृंखला टिकण्यासाठी आत्म्याचे संगीत ऐकुया स्वभाव…
-
स्वातंत्र्य दिवस – SWAATANTRYA DIVAS
मी जेंव्हा पाखरू होते तेंव्हा झाडावर राहायचे आणि सतत बडबडायचे कारण तेंव्हा मला लिहिता येत नव्हते… पण जेंव्हा मी पक्षी बनले तेंव्हा मी झाडावरून खाली उतरले मग मी या झाडावरून त्या झाडावर इकडे तिकडे चोहीकडे उडायला लागले… मग मला वाचता पण यायला लागले मग मी गप्पीष्ट झाले मी निवांत गप्पा मारू लागले पाखरांशी पक्ष्यांशी खगांशी…
-
धिंगाणा – DHINGAANAA
पुन्हा पुन्हा यावी दारी पावसाची सर चिंब चिंब व्हावे पुन्हा मन सैरभैर अंगणात चिमण्यांनी धिंगाणा घालावा आई आई म्हणताना जीव वेडा व्हावा येशीलका आई घरी होउनीया परी दादांसवे गप्पागोष्टी करावया घरी रांधेन मी तुझ्यासाठी मऊ भात खीर दादांसाठी लढावया होईन मी वीर आई दादा कुठे आता असाल जगात जिथे आहे तिथे तुम्ही असाल सुखात…
-
मी जेंव्हा लहान होते – MEE JEVHAA LAHAAN HOTE
मी जेंव्हा लहान होते; तेंव्हा आईसुद्धा लहान होती माझ्यासारखीच दादांसाठी भाजीभाकरी करीत होती… आई जेंव्हा परी होती चित्रासारखी सुंदर होती! तेंव्हाच मी शिकले… चित्र काढायला आणि दादा शिकले चित्रात रंग भरायला आणि भाऊ बहिण शिकले खदखदून हसायला हा! हा! हा! मग आई शिकली वाचायला आणि लिहायला, गायला… मग जेंव्हा आई गोष्टी लिहायला लागली तेंव्हा दादा…
-
अजूनही ती – AJOONAHEE TEE
अजूनही ती मजला जपते अडखळता मी उंबरठ्याशी… हात देउनी मज सावरते अजूनही ती मजला जपते गाठी घालित आणिक आवळीत बसते जेव्हा शल्य मनातिल हळूच शिरते बोटांमध्ये उकलुन गाठी मन उलगडते अजूनही ती मजला जपते… तिचे सजवणे घास भरवणे आठवताना मन झरझरता नाजुक साजुक बोली बनते अश्रुंसंगे बोलत बसते पापण काठी बांध घालते अजूनही ती मजला…
-
संपदा घेऊन ये – SAMPADAA GHEOON YE
रंगल्या पूर्वेसवे तू रंग ते लेऊन ये कोवळ्या किरणांसवे तू संपदा घेऊन ये गातसे आकाश गझला पंख तू पसरून ये कुंकवाला शुभ्र भाळी आज तू रेखून ये कैद करण्या शृंखला या ठेवल्या नाहीत मी थांबली गाडी जरी ना साखळी खेचून ये येच उल्के भूवरी या बहरण्या फुलण्या गडे वाटली ‘भीती’ जरी ‘तिज’ अंबरी फेकून ये…
-
होतसे मी क्रुद्ध आता – HOTASE MEE KRUDDH AATAA
होतसे मी क्रुद्ध आता जाहले बघ वृद्ध आता शब्द पुद्गल जाणते मी पेटवीती युद्ध आता शब्द आतुर बोलण्या पण कंठ का अवरुद्ध आता रंगले मन रंग उधळुन कोण येथे शुद्ध आता नांदता चित्तात शांती भासते मी बुद्ध आता वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा.