-
अजूनही ती – AJOONAHEE TEE
अजूनही ती मजला जपते अडखळता मी उंबरठ्याशी… हात देउनी मज सावरते अजूनही ती मजला जपते गाठी घालित आणिक आवळीत बसते जेव्हा शल्य मनातिल हळूच शिरते बोटांमध्ये उकलुन गाठी मन उलगडते अजूनही ती मजला जपते… तिचे सजवणे घास भरवणे आठवताना मन झरझरता नाजुक साजुक बोली बनते अश्रुंसंगे बोलत बसते पापण काठी बांध घालते अजूनही ती मजला…
-
संपदा घेऊन ये – SAMPADAA GHEOON YE
रंगल्या पूर्वेसवे तू रंग ते लेऊन ये कोवळ्या किरणांसवे तू संपदा घेऊन ये गातसे आकाश गझला पंख तू पसरून ये कुंकवाला शुभ्र भाळी आज तू रेखून ये कैद करण्या शृंखला या ठेवल्या नाहीत मी थांबली गाडी जरी ना साखळी खेचून ये येच उल्के भूवरी या बहरण्या फुलण्या गडे वाटली ‘भीती’ जरी ‘तिज’ अंबरी फेकून ये…
-
होतसे मी क्रुद्ध आता – HOTASE MEE KRUDDH AATAA
होतसे मी क्रुद्ध आता जाहले बघ वृद्ध आता शब्द पुद्गल जाणते मी पेटवीती युद्ध आता शब्द आतुर बोलण्या पण कंठ का अवरुद्ध आता रंगले मन रंग उधळुन कोण येथे शुद्ध आता नांदता चित्तात शांती भासते मी बुद्ध आता वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा.
-
गाडी – GAADEE
मी पाहते मला अन सुटते सुसाट गाडी मी वाचते तुला अन बनते विराट गाडी डब्ब्यात बैसलेले सारेच शब्द वेडे शेरात कोंबता मी होते पिसाट गाडी घेताच वेग चाके गगनात धूर ओके ओझे कितीजणांचे ओढे मुकाट गाडी मस्तीत शीळ घाले वळवून देह डोले जो नियम पाळतो त्या देतेच वाट गाडी जोडून लाकडांना बनली नवीन बग्गी दौडे…
-
मृगजळी – MRUGAJALEE
हाय! मी वेडी किती रे रंगले त्या मृगजळी चुंबिले प्रतिमेस भ्रामक दंगले त्या मृगजळी शिल्प कोणा प्रेमिकांचे घडवितो शिल्पी कुणी बनविता कैदी तयाला भंगले त्या मृगजळी बेरकी होत्याच वृत्ती वृत्त होते नेटके अर्थ पण फसवे परंतू संपले त्या मृगजळी यक्षही नावेत होते जादुई खुर्च्या तिथे चिकटले खुर्च्यांस जे जे गंडले त्या मृगजळी गझल सच्ची घेउनी…
-
उरेन मी – UREN MEE
जे मला पटेल तेच करेन मी जाळुनी पूरून हाव उरेन मी तूच बेजबाबदार नको म्हणू सांडली तशीच प्रीत भरेन मी पोहताच कालव्यात रुबाब का? सागरात भोवऱ्यात तरेन मी तू तुझा अहं गडे कुरवाळिशी जिंकताच ‘मी’पणास हरेन मी कागदी फुले जरी चुरगाळिली आजही बनून दुःख झरेन मी आठवांस त्या सुरेल अजूनही कोंडुनी रचून गीत स्मरेन मी…
-
ब्रीद – BREED
मतदानाला जाऊ सारे निघा घरातुन बाहेर मतदानाचे केंद्र सुरक्षित जणू साजिरे माहेर प्रातःकाळी उठून सगळी कामे करुया भरभर केंद्रावरती गर्दी होता रांगा लावू झरझर आठवणीने घेउन जाऊ ओळखपत्रे खरीखुरी मतदानाचा हक्क बजावुन आनंदाने येऊ घरी नको गुलामी पाय चाटणे स्व-अभिमानी बनू बरे अंधश्रद्धा पूर्ण उखडणे हे तर माझे ब्रीद खरे