Category: Marathi kaavya

  • ध्रुव तारा – DHRUVA TAARAA

    कैकवेळा नाव लिहिले खोडलेही कैकदा पण पहाटे साद घाली ध्रुव तारा हासरा मी कधी होते तुझी अन मी कधी माझीचरे गुंतले नावात होते मी तशी साधीचरे नाव असुदे गाव असुदे गुंतलेली वासना आत्मियाशी फक्त जोडे शुद्ध सुंदर भावना मुग्धता प्रेमातली वा धुंद लाटा सागरी स्वर्ग मी हिंडून येते घेत त्या अंगावरी आज मी आहे इथे…

  • तुझी प्रिया – TUZEE PRIYAA

    नको म्हणू मज बदललीस तू अशीच आहे तुझी प्रिया नको म्हणू तिज घडवलेस तू अशीच आहे तुझी प्रिया घडवायाचे कुणी कुणाला जो तो घडतो स्वतः स्वतः प्रेमाने ती फुलते खुलते अशीच आहे तुझी प्रिया कुणी कुणाहुन नाही सुंदर कशास तुलना करिशी तू तुलनेने या कोमेजे ती अशीच आहे तुझी प्रिया गोड हासते खरे बोलते म्हणुन…

  • तुला देत आहे काही – TULAA DET AAHE KAHEE

    तुझे घेत आहे काही तुला देत आहे काही ।। मृदू पालवीने फुलतो पुन्हा पुन्हा फळतो रमतो नवे येत आहे काही तुला देत आहे काही… अंगणात नाचे वारे उघड खिडक्या सर्व दारे प्रेम नेत आहे काही तुला देत आहे काही… पाजु पाणी तरू रोपा बांधुयात घरटे खोपा वाळु रेत आहे काही तुला देत आहे काही… काव्यमळा…

  • अनुभव – ANUBHAV

    तृणपात्यांची लवलव सळसळ चिमणपाखरे करिती कलरव दाणे टिपता चाले पदरव भ्रमरांचा गुणगुण गुंजारव जुने तरीही भासे अभिनव रोमांचित मम अवघे अवयव अनुभूतीचा अनुभव सुंदर गझलेचा काव्यातुन उदभव शब्दांमध्ये मार्दव शैशव माधुर्यातिल आर्जव लोभस मात्रावृत्त -१६ मात्रा

  • स्वप्न देखणे – SWAPN DEKHANE

    सौधावरती उभे राहुनी पहात राहू स्वप्न  देखणे झाडावरती महाल अपुला निवांत गाऊ गीत साजणे हवेत उडते विमान सुंदर खरी कराया सजग कहाणी हात असूदे हातामध्ये नको गोठणे नको तापणे

  • वसंत गीत – VASANT GEET

    माघ फाल्गुनी वसंत वारे कृष्ण अंबरी अनंत तारे आम्रतरू गुलमोहर फुलतो बहर जोवरी तोवर झुलतो पक्षी उडती दिगंत सारे चैत्र उन्हाची रंग पंचमी गाते सरिता दंग संगमी गीत तिला जे पसंत गारे ग्रीष्म काहिली येथे तगमग सहा ऋतुंची जेथे लगबग घेण्या अंमळ उसंत यारे मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)

  • धागा – DHAAGAA

    काळ्या मातीमधली धवला नाजुक साजुक कपास आणू साध्या यंत्रावरती हलके कोमल कणखर दोरा बनवू वळून दोरे हातावरती अखंड मजबुत धागा घडवू मृद्गंधासम बकुळ फुलांच्या अर्कामध्ये त्याला बुडवू जास्वंदीच्या चुरुन पाकळ्या कुंकुमवर्णी रंगी भिजवू सुकवुन धागा पीत सुवासिक शेवंतीची फांती गुंफू सुई कशाला फुले गुंफण्या कुशल अंगुली आपण वळवू