-
कातरवेळी – KAATARVELEE
अचूक कैश्या घटिका मोजू अंधुक धूसर कातरवेळी दिवा लाविता ज्योतीवरती पतंग जळती कातरवेळी बोलायाचे ऐकायाचे बरेच जे जे राहुन गेले आठवुनी तुज तेच बोलते तुला ऐकते कातरवेळी जिथे जिथे मी तुला भेटले नजरेमधले गूढ वाचले अश्या जळिस्थळी शांत तरुतळी फिरून येते कातरवेळी मौनामधले प्रश्न बोलके अधरावरती गोळा होता गाते भजने स्तोत्र आरत्या देवापुढती कातरवेळी हृदयावरती…
-
जाण – JAAN
कर्तव्याचे भान असूदे हक्क मागताना खरेपणाची जाण दिसूदे भाव तोलताना स्याद्वादाची दृष्टी असूदे अर्थ लावताना व्यवहारातिल चोखपणाला व्यवहाराने जाणा व्यवहारातिल निश्चय जपण्या ताठ असावा बाणा ताठ असावा कणा बुद्धिचा परी नच ताठर रे ममतेच्या पातीची त्यावर घालू पाखर रे लेखणीची वा तलवारीची जात इमानी खरी जीवातिल चैतन्य टिपाया लढते धरेवरी लढता लढता पडेल अथवा मरेल…
-
निखार – NIKHAAR
ठिणगी पडण्या गार घासुया गारेवरती निखार फुलण्या फुंकर घालू जाळावरती वात टिकाया वात वळूया हातावरती ज्योत तेवण्या ओंजळ धरुया समईवरती फूल जपाया देह तोलुया काट्यावरती प्रेम जिंकण्या शौच धरूया सत्यावरती राध उजळण्या कषाय जाळू अग्नीवरती मात्रावृत्त(८+८+८=२४ मात्रा)
-
मुग्ध गारवा – MUGDH GAARAVAA
पौषामधली पहाट माझ्या मनात नीतळ गाणे गाते मम आईच्या मृदुल मनाची झुळूक शीतल गाणे गाते मुग्ध गारवा सुखद शहारा अंगागाला स्पर्शून जाता मौनी पदपथ अविचल तारे निश्चल सळसळ गाणे गाते असशिल कोठे ठाऊक नाही तरी कल्पना मनी खेळते निवांत वेळी शांत एकटा गाठुन तरुतळ गाणे गाते
-
गारवा – GAARAVAA
केळी द्राक्षे दहिभाताचा धाड गारवा तोलायाला वजने मापे एक ताजवा बसून जेवण करण्यासाठी अंथर चटई असेल जेथे थंड जलाचा स्वच्छ कालवा मिरचीठेचा उसळ मुगाची झुणका भाकर चवीचवीने खाइल चिमणी द्वाड पारवा गाजर-हलवा चिक्की बर्फी पानसुपारी देउन तिळगुळ नात्यांमधला जपू गोडवा किलबिल करतिल मुले पाखरे झाडांभवती फुलेल मोहक कळ्याफुलांचा शुभ्र ताटवा
-
सोने खरे रे – SONE KHARE RE
सोपे दिसे रे अनवट कसे रे कोडे पडे रे नाते नवे रे नकळत फुले रे व्हावे खुले रे आहे जुने रे अवघड कुठे रे सोने खरे रे मात्रावृत्त (४+३+२=९ मात्रा)
-
कोंडा मळ तू – KONDAA MAL TOO
कोंडा मळ तू बडव बडव तू मांडे तळ तू वाती वळ तू तबक सजव तू पूजा कर तू पक्षी बन तू किलबिल कर तू गाणे म्हण तू मात्रावृत्त(४+२+२=८ मात्रा)