Category: Marathi kaavya

  • प्रतोद – PRATOD

    रथावरी सारथी करी मी कडाड उडवित प्रतोद आहे सुटावया छिडकत्या जिवांना गती जयांची निगोद आहे मला न भावे हसुन हसविण्या कुटील रोगी टवाळ वृत्ती लयीत येता भाव पकडतो सहज निखळ मम विनोद आहे फुकाच भाषा अता तहाची टळून गेली जुनाट घटिका नवीन स्वप्ने पुरी कराया भरारणारा प्रमोद आहे कशास तारा उगाच छेडू घनी विजेच्या अश्या…

  • काळाला ना घाबरते – KALALA NA GHABARTE

    धवल झेंडूचे गोंडस झेले बघत राहूदे आले गेले पर्णांच्या पोपटी मनावर झुंबर अंबर निळसर शेले … काळाला ना घाबरते वेळेला मी सावरते हृदयी माझ्या मम आत्मा मायपित्यांना आठवते … वाद नको संवाद हवा काव्याचा मज नाद हवा साद घालण्या खरी खरी आल्या पुन्हा शब्द सरी …

  • क्षण पकड – KSHAN PAKAD

    खिडकीतुनी काय दिसे…. सांग मना सांग तुला … कौलारू घर निवांत … झोपलाय प्रहर शांत … या इथे पण पहा … वाऱ्याने सळसळता … पिंपळ बघ हसत उभा … पिंपळ करी सळसळ बघ … सोड वृथा हळहळ बघ … घे जगून क्षण पकड … उघड उघड … दार उघड… पिंपळ हा सांगतसे … विसर शब्द…

  • पल्लवीत – PALLAVEET

    धवलगान गावयास उत्सुक मन पल्लवीत… अंतरात भावपुष्प … लिहित होत पल्लवीत … ताटवा फुलून मंद… उधळतोय प्रीत गंध … टळटळीत प्रहर वेळ… जुळव शब्द भावबंध ….

  • नाजुक चण – NAAJUK CHAN

    नाजुक चण .. कणखर मन … फिकुटल्या गुलाबी पाकळ्यात … लपेटून तन …. मन लुटतय … निसर्गाचं धन… डेझी डेलिया ..चमेली चाफा … रंगबिरंगी … फुलांचा वाफा … अवतरला भुईवर … जादुई ताफा …

  • ध्यानात खोल जाता – DHYAANAAT KHOL JAATAA

    ध्यानात खोल जाता आत्म्यात जिन दिसावा कुसुमांसवे कळ्यांनी पानांस रंग द्यावा झरता झरा उन्हाचा डोळे मिटून प्यावा जग शांत चित्त होता वारा पिऊन घ्यावा निजल्यावरी मनाला झोका हळूच द्यावा स्वप्नात माय येता चाफा फुलून यावा शब्दात तव सुनेत्रा मृदु भाव मी भरावा

  • कुल्फी – KULFEE

    दुपार झाली आला कोणी विकावयाला गारेगार दुधी गुलाबी कुल्फी कांडी बनवुन चटपट चारे गार सायकलीवर उन्हात फिरुनी थकून होता घामेघूम गच्च ढगांची नभात दाटी सुटले अवचित वारे गार गरगरणाऱ्या वावटळीवर मजेत पाचोळा उडतोय ऊन बैसले झाडाखाली पक्ष्या गाणे गा रे गार मेघ कशाला गडगड करती .. वीज कडाडत दळते काय अता न असले प्रश्न तपविती…