-
सांज गोरीमोरी – SAANJ GOREE MOREE
किती ऊन सोने सांडते उन्हाळी काया घाम गाळे वेचून वेचून उन्हाचे चांदणे उन्हाचा पाऊस पेरण्या अक्षरे लेखणी झरेल ऊन सावलीत सावली उन्हात सावली रापते गव्हाळते ऊन झाकोळता नभ ऊन काळवंडे गर्द कडुनिंब त्याला वारा घाले गोधन गोठ्यात वाहने सुसाट उंबऱ्यात बाळ पाहतेय वाट ऊन काळगेले सांज गोरीमोरी धुळीत खेळून उभी शांत दारी संधिकाली तूप साजुक…
-
डेपो टिंबर – DEPO TIMBAR (DEPOT TIMBER)
कवितेसाठी कारण मजला सकाळ सुंदर आहे गझलेसाठी सुंदर कारण मनात मंदिर आहे काव्यसंपदा माझी मजला निळसर अंबर आहे किणकिणणारे घरात माझ्या झुलते झुंबर आहे एक जादुई माझ्यापाशी वजनी कंकर आहे गझलियतीचा त्यात टाकला मी रे मंतर आहे खेळायाला उड्या मारुनी डेपो टिंबर आहे पटांगणावर बूच फुलांनी सजला डंपर आहे गझलेमध्ये मक्ता लिहिणे हा नच संगर…
-
क्रोकरी – KROKAREE ( CROCKERY )
एक ओळ मज सुचते जेंव्हा लिहावयाला काही भातुकलीतिल पितळी भांडी का घासू मी बाई टाळेबंदीच्या डावातिल डाव पळ्या अन काटे घासायाला भांडेवाली नकोच म्हणते वाटे मीठ चिंच वा लिंबू फोडी नको घालवू वाया पितांबरीने लख्ख उजळते तांबे पितळी काया किणकिणणारी सान क्रोकरी चहा म्हणूनी पाणी तरंग उठता हलके हलके अधरी बडबडगाणी
-
पूर्वभव – PURVABHAV
थबकुनी अंदाज घेतो शेर माझा आगळ्या डौलात येतो शेर माझा भावनांचे मेघ तपुनी थंड होता अंतरी चाहूल देतो शेर माझा पाहता मुनीराज ध्यानी मौन विपिनी बैसतो त्यांच्यापुढे तो शेर माझा कैकवेळा खोडुनी मी परत लिहिता पूर्वभव कुठला स्मरे तो शेर माझा जाग येता मज पहाटे शांत समयी शिखरजी यात्रेस नेतो शेर माझा
-
आत्महित – ATMAHIT
काळांना मी तिन्ही वापरे माझ्या आत्म्याचे हित करण्या लेखणीस मी सतत चालवे माझ्या आत्म्याचे हित करण्या आत्महिताला जो जाणे तो सहजच परहित करतो रे नी सा ग प म ध सारे माझ्या आत्म्याचे हित करण्या
-
गोडवा – GODVAA
मी मौनाशी मैत्री केली मौनातच मम आरोळी शब्दांसंगे खेळ कागदी भरते कर्मांची झोळी अधरांवर तर्जनी न नाचे साक्षीभावे अचल उभी मकरंदी गोडवा गुळाचा निर्जरेस नव चारोळी
-
मधुरस – MADHURAS
मुग्ध मधुरस माय मराठीचा मज मिळतो मुग्ध मधुमित माता मम्मीचा मज मिळतो मोरणी मी मित्रत्वाची मान मनोरम मुग्ध मालन माल मोजता मसि मध मिळतो