-
आत्महित – ATMAHIT
काळांना मी तिन्ही वापरे माझ्या आत्म्याचे हित करण्या लेखणीस मी सतत चालवे माझ्या आत्म्याचे हित करण्या आत्महिताला जो जाणे तो सहजच परहित करतो रे नी सा ग प म ध सारे माझ्या आत्म्याचे हित करण्या
-
गोडवा – GODVAA
मी मौनाशी मैत्री केली मौनातच मम आरोळी शब्दांसंगे खेळ कागदी भरते कर्मांची झोळी अधरांवर तर्जनी न नाचे साक्षीभावे अचल उभी मकरंदी गोडवा गुळाचा निर्जरेस नव चारोळी
-
मधुरस – MADHURAS
मुग्ध मधुरस माय मराठीचा मज मिळतो मुग्ध मधुमित माता मम्मीचा मज मिळतो मोरणी मी मित्रत्वाची मान मनोरम मुग्ध मालन माल मोजता मसि मध मिळतो
-
तिप्प – TIPPA
मन शीतल कर चिंब भिजाया शुष्क भावना तपून अश्रू पिंडी झाल्या रुक्ष भावना दुबळे मन जर होते हळवे वात्सल्याने देत सावली व्यक्त करतसे वृक्ष भावना शुद्ध अशुद्धाची चर्चा बस गडगडणारी धवल घनांना सजल बनवती कृष्ण भावना किती जागुनी गस्त घालशिल स्वतः स्वतःवर नीज सुखाची येण्या पांघर सुस्त भावना गझलेमधला गळेल पारा वृत्त फोडुनी साच्यामध्ये ठोकशील…
-
वेळ – VEL
ही न वेळ असे खरी वाट पाहण्याची…. हीच वेळ असे खरी भेटाया जाण्याची… गप्पांच्या मैफलीत रंग नवे भरण्याला … हृदय उघड उघड मना काव्य नित्य झरण्याला …. बोल फक्त बोल गात गुणगुणता काही… अंतरंग सांगतेय गुज मला बाई….
-
अत्तर घन – ATTAR GHAN
अधर सहज मिटलेले रेषेवर जुळलेले आघात न कसलाही प्रतिघातच उठलेले पर्णांचे शुष्क थवे वाऱ्यावर उडलेले पानातुन तांबुस दो मौन तुझे हसलेले स्वप्नातच स्वप्न जणू नवल खरे घडलेले क्षितिजावर सांज उभी अत्तर घन झरलेले गा गा गा गुणगुणता उत्तर मज सुचलेले जगण्याची आस नशा जीव जगी रमलेले नीर सुनेत्रात पुन्हा पापण दल हललेले
-
आत्मजा -AATMAJAA
मोरपंखी कुंचला दहिवराने चिंबला कल्पना माझ्या खऱ्या तरल कोमल श्रुंखला गीत कविता गझल धन जीव माझा दंगला साखळी सहजी तुटे मोद भूवर सांडला जपत आले सर्वदा भाव हळवा दंगला पंचभूते नाचता काळ नाही भंगला मी सुनेत्रा आत्मजा देहरूपी बंगला