Category: Marathi kaavya

  • माझं घर – MAZA GHAR(MY HOME)

    माझं घर माझं घर घरासमोर डोंगर माझ्या घरात शांतीचा आहे कायम वावर आम्ही दोघे लेकासंगे सदा सुखात अपार लेकीप्रमाणेच लेक व्यवहारा चोख नेक सुवर्णाची रास नाणी माझं घर सोळा खणी माझं घर माझं घर माझ्या लेकीचं माहेर माझं घर माझं घर माझ्या नातीचं आजोळ जावयाच्या संगे येई नात आणि लेक बाई माझ्या घरात गोकुळ ज्ञानीयांची…

  • संवेदनशिल – SANVEDANSHIL(SENSITIVE)

    ना विनोदी ना निगोदी नात माझी संवेदनशिल आळशी ना बावळी ना जात माझी संवेदनशिल मी न मिथ्या रीत सांगे आत्मघाती जाचणारी मूळ फांद्या पुष्प बीजे पात माझी संवेदनशिल काय सांगू अंद्धश्रद्धा पोसलेल्या मानवांनी टाकते जीवांस जपण्या कात माझी संवेदनशिल नित्य स्वाध्यायातुनी मी जाणले रे स्वरुप आत्म्या लेकरे तत्वार्थसूत्री सात माझी संवेदनशिल भजन कीर्तन विठ्ठलाचे पांडुरंगाची…

  • निगोदी – NIGODEE(MICROSCOPIC SOULS)

    तुझी स्वतःची कर्मे तुजला धरतील धारेवरती नाचवून निःकाचित कर्मे फळतील धारेवरती सुधारेन मी पुट्पुट अस्फुट बुडबुडा पाण्यावरचा असे बुडबुडे सुकून ओठी अडतील धारेवरती शब्द परजुनी तप्त विळीसम शेरात प्रकटता झणी जीव निगोदी सुटण्यासाठी उडतील धारेवरती तीन शेरांचे मुक्तक.

  • हाळी – HAALHEE(A LOUD CALL)

    गझल .. .. … …. हाळी . . . . .  .. पाखरांचे बोल चाली जीव काया रानमाळी ये मनीमाऊ सकाळी द्यावया दारात टाळी रानवारा हूड भारी वाह्तोया देत हाळी गारव्याला सावलीला बैसलीया माय काली रातराणीला जपाया कंटकांची वीण जाळी दो कळ्यांसह उमलताना वल्लरी अंधार गाळी ऊस मैतर नारळाचा पाहुनी तुज साद घाली कोण सच्चा…

  • बोला चाली – BOLA CHALI(CONVERSATION)

    पाखरांची बोला चाली माझ्यासंग साद घाली रानवारा वाहणारा जीव माझा रानमाळी ऊस नारळात गुज टिपतेय काळी माती गारव्यात सावलीत बैसलीया देत हाळी कसं कसं मी सांभाळू जिन माझा खरा भाऊ …

  • प्रांत – PRAANT(PROVINCE)

    एक पान एक गाव एक प्रांत एक देश एक तीर्थ घाट छान नीर स्वच्छ नेक देश जायचे मला असेच गात गीत गझल गोष्ट पंच परम पद स्मरण जिनालयात लेक देश

  • कोरफड – KORFAD(ALOE VERA)

    आभाळ मेघ छाया पाऊस देह छाया रानात ऊस नारळ गच्चीत येय छाया दारात कोरफड ही रसदार पर्ण छाया रचतो विटा शहाणा लपते विटेत छाया व्यापार भावनांचा करते जपून छाया कसला विटाळ सांगा जर सोवळ्यात छाया मी संयमी ‘सुनेत्रा’ सांगेल आज छाया