Category: Marathi kaavya

  • लोंढा – LONDHAA

    धादांत खोटे बोलले मी पण क्लांत खोटे बोलले मी कोंडीत लोंढा दाटलेला मन शांत खोटे बोलले मी जे जे हवे ते प्राप्त होता मज भ्रांत खोटे बोलले मी अज्ञान माझे दावण्यास्तव ते प्रांत खोटे बोलले मी बोंबा खऱ्या होत्या जरी त्या आकांत खोटे बोलले मी

  • गझलमणी – GAZAL MANEE

    जादुगार सोन्यासम पिवळा,करांगुलीवर नीलमणी.. खरा दागिना हेमंताचा,झळाळणारे शील मणी… सोन्याचे मी मणी गुंफिता,जुन्याच धाग्यामधे पुन्हा.. कनक मण्यांच्या माळेमध्ये,झाले नव सामील मणी … गळ्यात काळी पोत मण्यांची,मोजले न मी मणी जरी… अजून कांही आले तेंव्हा,करण्यासाठी डील मणी… आई माझी शिरोमणी जणु ,कधी न गळले अश्रु तिचे… मोरपिसांसम मायेच्या मज,तिच्या सयी सच्छील मणी… स्फटिक मण्यांची माळ जपाची,मणी…

  • कुंचला – KUNCHALAA

    करी कुंचला सहज घेऊनी… रंगामध्ये पूर्ण बुडवूनी… सहज सहज फटकारे मारून … चित्र एक साकारे त्यातून… भिजव भिजवले त्यास चिंबूनी … रंगांवरती रंग उडवूनी … भिजला कागद… भिजली पाने… नवरंगांनी सजली पाने… अनेकान्त भावांची किमया… जणु पौषाची धारा तनया …. रंग आप अन भाव मनातील … करी उतरता …भिजतो कागद… सुकतो… भिजतो… पानावरती चित्र उमटते……

  • चरखा – CHARKHAA

    न पिते न खाते का बाई हरवून जाते का बाई चरखा फिरवुनी सूत जमे तेंही न काते का बाई पाऊस येता शब्दांना विसरून गाते का बाई फसवून पळवे प्रीतीला फिरवून नाते का बाई फिरवीत बसते कलम नवे घासून पाते का बाई

  • मोतीमाळ – MOTEE MAAL

    लिहावी वाटते जेंव्हा कविता .. तेव्हाच लिहावी असं काही नाही कामे करता करताही लिहावी कविता एखादी .. किंवा रस्त्यातून चालता चालताही …. लिहावी एखादी कविता.. कामे असतातच निकडीची …रोज रोजच्या जगण्याची… ती तर करायलं हवीतच आधी… त्यानंतर मग… लिहावीच एखादी मुग्ध कविता… वेळ काढून …मूड पाहून.. साठलेल्या भिजलेल्या शब्दांतून ,,उचलावेत काही शब्द…काही क्षण… आणि लिहीत…

  • जेली – JELEE

    रांधली स्वतः मी कवठ गुळाची जेली कणकेस भिजवुनी निरांजने दो केली सुकवून तयांना दिवे तेवता दारी थरथरली पर्णे आम्रतरूची सारी

  • अप्पदिवो – APP-DIVO

    अप्पदिवो मम अलख निरंजन नय दृष्टी सम अलख निरंजन कर्मफळे रसमय मिळवाया रत्नत्रय दीपक उजळाया व्यवहाराचा जम बसवाया मुक्तछ्न्द तम भ्रम पळवाया जीवाचा अभ्युदय व्हाया