Category: Marathi kaavya

  • चीप -CHEEP

    अजून केस मोकळे क्लीप पाठवून दे तिमिर पळुन जावया दीप पाठवून दे लिहू कसे अता तसे टोक मोडलेय रे लिहेन मी पुढे कधी नीप पाठवून दे झरत झरत भरत गात चालतेय लेखणी झरावया भराभरा जीप पाठवून दे भरावया हृदय घडे माठ घागरींसवे सुडौल घाटदारसे पीप पाठवून दे नकोत गोठ पाटल्या मिरवण्यास दो करी सुवर्ण कंकणे…

  • वाघळे – VAAGHALE

    पहाट झाली जागी झाले ऊठ वाघळे मला म्हणाली अंधारातच पिंपळ सळसळ करतो आहे मला म्हणाली झिपरी पोरे मजेत गाती वेचत कचरा रस्त्यावरती गुणगुण गाता गाता गाणी असे गायचे मला म्हणाली बूच फुलांचा सडा मनोहर वेचायाला फुले जायचे स्वप्न किती दिवसांनी अजुनी पुरे व्हायचे मला म्हणाली फिरावयाला निघे पाखरू घरट्यामधुनी माय पाहते चिमण पाखरे किलबिल करती…

  • घडी – GHADEE

    झरझर धारा गर्जत याव्या तप्त दुपारी उतरुन याव्या डोळ्यांमधुनी सुस्त दुपारी भरता डोळे भरती पाने गर्द निळाई टपटप झरते तुझी आठवण फक्त दुपारी अवतीभवती किती धावपळ वर्दळलेली कशी लावु मी वर्दळीस या शिस्त दुपारी संघ्याकाळी उरेल काही लिहावयाला … वाटत नाही करेन सारे फस्त दुपारी असेच काहीबाही सुचते येते वादळ शोधत बसते जुनेपुराणे दस्त दुपारी…

  • नीर झुंबर- NEER ZUMBAR

    उगवले मातीतुनी वर कैक अंकुर हे नवे बांधले गगनास जेव्हा नीर झुंबर हे नवे नाचरी आली हवा अन सान रोपे डोलती सज्ज ती करण्यास आता रोज संगर हे नवे उतरले यानातुनी मी सावळ्या रेतीवरी पाहता सागरतिरावर भव्य बंदर हे नवे लागले धक्क्यास गलबत त्यात होती बासने त्यातुनी मी उचललेले ग्रंथ सुंदर हे नवे गगनचुंबी उंच…

  • पाठवण – PAATHAVAN

    लिहावयाला मजला पुरते एक आठवण आठवणींची नकोच गर्दी नको साठवण स्मरणांचे मी मणी ओवुनी माळ बनवली गळलेल्यांची करित आहे पुन्हा पाठवण जखमांमध्ये हळद भरूनी जखमा भरल्या मलम सुगंधी मला न रुचले जखमा सुकल्या मधुर मधुर मी शब्दांवरती नव्हते भुलले मधुराभक्ती शुद्धात्म्यावर जडवुन बसले जरी हरवले पुन्हा गवसले माझे मजला वळणावरती वळता वळता सापडले मजला

  • जाबसाल – JAABSAAL

    कशास आता जाबसाल ते रोजरोजचे उतरुन ठेवू सांग मनाला बोझ रोजचे नसलेलेही दिसते आणि बिंब उमटते हृदयजलावर किती फुलांचे मोज रोजचे

  • घडणावळ – GHADANAAVAL

    आठवण येता लयीत येते गझल गडे शब्द सुरांचे नाते जडते तरल गडे वळती गझला झुलती गझला ऊर्ध्वगतीने सांग कशाने वळणे झाली सरल गडे झुळूक येता सुगंध भरली बांधावरुनी मम हृदयीचे मेघ जाहले सजल गडे शब्द सुरांचे कळप जाहले उन्हात बसले तापतापुनी शुभ्र जाहले अमल गडे नवलाईचे दिवस नऊ ग घडणावळीचे घडविण म्हणता खरेच घडले नवल…