Category: Marathi kaavya

  • श्रेणिकांची लेखणी मी – SHRENIKAANCHEE LEKHANEE MEE

    विकृतीशी युद्ध करते श्रेणिकांची लेखणी मी संस्कृतीला मुक्त करते श्रेणिकांची लेखणी मी अन्नदात्री मायभूमी तृप्त होउन गावयाला जैनियांना मुग्ध करते श्रेणिकांची लेखणी मी ऐतिहासिक दस्तऐवज नेटवरती जतन करण्या गाळशाई शुद्ध करते श्रेणिकांची लेखणी मी ललित साहित्यात आणुन पारिभाषिक शास्त्रसंज्ञा गंड सारे लुप्त करते श्रेणिकांची लेखणी मी साठल्या पाण्यात जंतू वाढल्यावर ऊन्ह बनुनी दलदलीला शुष्क करते…

  • बिंदेस्वरू – BINDE SWAROO

    अपराजिता सिद्धायिका निष्कामचंडाली नवी बाणेश्वरी धनुरासनी भृकुटी परी पद्मावती वीवा विवी बाणेश्वरी छेडीत वीणा ग्रंथ घागर नीर भरली सांडते डोईवरी स्वर्गातुनी आली शिवा हृदयातुनी देते शिवी बाणेश्वरी चक्रेश्वरी गरुडावरी बिजलीपरी शंखास फुंके अंबरी लक्ष्यावरी ठेवून डोळा भेदते केंद्रा कवी बाणेश्वरी कोरावई कुसुमांडिनी रक्षावया सृष्टीस ज्वालामालिनी लंघून कक्षा झेलते भाळावरी जळता रवी बाणेश्वरी सल्लेखना घेता बला…

  • उठाठेव – UTHAATHEV

    कोण पोचले कोणाआधी हिशेब असले तूच ठेव ग तुझ्या हिशेबांचे वारांचे, कधीच नव्हते मला भेव ग अतिथी देवासमान असतो, तुला न कळला हा व्यवहार निश्चय जाणुन व्यवहारातिल भुकेल्यातला पहा देव ग काजळणे कुढणे घुसमटणे, यातुन मुक्ती मिळावयास घनतिमिरातिल समईमधल्या फुलवातीसम शांत तेव ग लष्करच्या भाकऱ्या बडविणे, जगण्यासाठी अवघड फार त्यापेक्षा तू अर्धी चतकुर राखुन भाकर…

  • स्थापना – STHAAPANAA

    वर्णमातृकेतिल स्वर सारे जमले सजले तबकामध्ये विरामचिन्हांचे दवबिंदू शुभ्र सांडले तबकामध्ये दहा दिव्यांनी उजळुन जाता दहा दिशातिल अनंत वाटा स्वरात मिसळुन व्यंजनाक्षरे शब्द उमलले तबकामध्ये नीर सुगंधी अक्षत पुष्पे काव्यशर्करा अंतर दीपक धूप चंदनी श्रीफल कळसा नीटस भरले तबकामध्ये केशर हळदी कुंकुम वर्णी तिलक रेखुनी मम भाळावर बिंबाचे प्रतिबिंब सुदर्शन झुकुन घेतले तबकामध्ये पंचपरमपद परमेष्ठींचे…

  • महती – MAHATEE

    हित मित प्रिय अन सत्य गुरूची वचने टिपते मी दशधर्माची महती कळण्या कवने रचते मी ऊद धूप कर्पूर जाळुनी लावुन दीप दहा प्रकाश आणिक परिमल यांनी भवने भरते मी पूर्वभवांच्या उकलुन गाठी धागा सरळ मिळे असले धागे धुते सुकविते वसने विणते मी ध्यानाग्नीने राख व्हावया निजगत कर्मांची जिनाबिंबा अंतरी स्थापुनी नयने मिटते मी काव्यफुलांची ओंजळ…

  • सृष्टीची जान – SRUSHTEECHEE JAAN

    आपट्याचं पान सोन्याची खाण आपट्याचं पान शेवाळी वाण ओरबाडु नका आपट्याचं रान आपट्याचं रोप किती किती सान आपट्याचं जपू वाढाया छान आपट्याचं झाड बागेची शान वृक्ष वल्लरीत सृष्टीची जान

  • डोरले – DORALE

    पर्व दशलक्षण दिगंबर जैनियांचे थोरले मी त्याचसाठी भावनेतिल अर्थ सुंदर खोरले मी साधका आत्माच साधन शुद्ध निर्मल जाणल्यावर मम मनाच्या आगमातिल शब्द दडले चोरले मी भूक्षमा अन मार्दवादी धर्म दाही पाळणाऱ्या भूतकालिन मुनिवरांचे शिल्प दगडी कोरले मी भक्तिपूर्वक अष्टद्रव्ये अर्पिल्यावर जिनप्रभूला शांतता मजला मिळाली झोपल्यावर घोरले मी ज्ञान श्रद्धा शील सम्यक तीन शेरांची गझल ही मिरविण्या…