Category: Marathi kaavya

  • शिरोमणि – SHIROMANI

    जळात मी मन मंदिर माझे रेखांकित केले लहरींवरती तरंगणारे उभे शिल्प केले शांत पीत जल लाटांवरती हरित नील धरती पंच शिखरयुत राउळातल्या घंटा झांजरती अवती भवतीचे मोक्षार्थी नर नारी सुंदर नीर नदीचे संथ वाहते त्यात झुले अंबर देउळ की हे जहाज अपुले शिखर कळस हृदया तीर्थंकर चोवीस शिरोमणि बेल पळस हृदया

  • घड्याळ अंबर – GHADYAL AMBAR

    चोविस ताशी घड्याळ अंबर मला दावते जिन तीर्थंकर शून्य प्रहर रात्रीचे बारा लख्ख झळकतो तारा तारा वृषभनाथ तीर्थंकर पहिले एक वाजता मजला दिसले अजितनाथ तीर्थंकर दुसरे दोन वाजता सुनेत्र हसरे संभव जिन तीर्थंकर तीज तीन वाजता लखलखे वीज अभिनंदन जिन चवथे भगवन चार वाजता त्यांचे दर्शन पंचम तीर्थंकर सुमती जिन पाच वाजले हृदयी किणकिण पद्मप्रभू…

  • सुमार भाव – SUMAR BHAV

    मधुर फळे अती कडू तुझ्यामुळेच जाहली बिया जरी न जून त्या मुळे खिळेच जाहली सुरुंग लावुनी भुईत ध्वस्त टेकडी दिसे इमारती नव्या उभ्या तळी बिळेच जाहली उन्हात वावरे फिरे थकून जाय रोज ती वहायचे खळाळुनी तरी तळेच जाहली नयन निळे नजर खुळी पडून पाकळ्यांवरी फुलांवरील अष्टगंध अन टिळेच जाहली सुमार भावसंपदा तरी म्हणे परीच मी…

  • कृतज्ञ – krutdnya

    कृतज्ञ मीही सुंदर सृष्टी सुंदर माझी सुंदर मुले डोळे माझे वीज अंबरी त्यावर अंतर झुले पूर्वजन्मिची पुण्याई मम जन्मोजन्मी वसे त्याचमुळे मम पूर्ण छबीही इतुकी मोहक दिसे अब्जाधिश मी आज जाहले सौख्य संपदा खरी हृदयी माझ्या आत्मप्रियाची वाजतसे बासरी पूर्ण देश अन पूर्ण जगाच्या सफरीला जाण्यास सज्ज जाहले कुटुंब माझे मोदाला लुटण्यास हवे हवे जे…

  • पाना – Pana

    छायाचित्रांवरती माझ्या कैक तारका फिदा खुद्द माझियावरती मरती खलनायक पण सदा स्वरुप मनोहर तेजस कांती झळाळते मम दिव्य झोपडीत मम माझे गुरुजन येतिल सारे भव्य पुत्र आणखी कन्या माझी हृदयीची दो रत्ने मात-पित्यांना गुरू मानुनी मोक्ष मिळविती यत्ने बिजागरीशी जोडुन नाते नट नि पाना माझा बोल्ट आवळुन झाकण बसवी वाजवीत ग बाजा शशांक मधुरा सुभाषसंगे…

  • रम्य झोपडी – RAMYA ZOPADI

    मैत्री अपुली इतुकी सुंदर मित्र-मैत्रीणीनो मैत्रीचा ही रम्य झोपडी मित्र-मैत्रीणीनो बघा वाहते झुळझुळणारे सुगंध भरले वारे स्मरती सारे रम्य आपुले दिस सारे प्यारे मैत्रीसाठी ठेवीन माझा प्राण तराजूमध्ये एकी आणि विश्वासाचे नाते मैत्रीमध्ये नकाच परके म्हणू इथे कुणा हीच खरी मैत्री जात धर्म अन प्रांत देशही म्हणती मैत्री खरी जरी न भेटतो रोज रोज पण…

  • जादुई – Magical

    मी जादुई कांडी आहे.. तीन रत्नयुत दांडी आहे… मम झेंड्याची शान तिरंगी .. हाती माझ्या फूल सुरंगी… शब्दांमध्ये मिठास माझ्या.. गाण्यामध्ये सुहास्य माझ्या… अंकांचा ना प्रभाव मजवर.. प्रभाव माझा रे अंकांवर… हा ना माझा इगो अहंपण.. हे तर आत्म्याचे कर्तेपण… सर्व अंक अन सर्व अक्षरे.. झुकून मज रे करिती मुजरे… उभी येथ मी दृढ श्रद्धेने..…