-
रत्नावली- RATNAVALI
योगि सौदामिनी मातृपितृछाया योगिनी खेळणी मातृपितृछाया योगणिर्जाधनी मातृपितृछाया योगिनी अंगणी मातृपितृछाया योगि नीरा मणी मातृपितृछाया योगिनीमाँ निनी मातृपितृछाया योग्य सिद्धायनी मातृपितृछाया योगिनी पाणिनी मातृपितृछाया योगु दादा मुनी मातृपितृछाया योगिनी अक्षिणी मातृपितृछाया योग सौधर्मिणी मातृपितृछाया योगिनी दर्पणी मातृपितृछाया योगु अणुरागिणी मातृपितृछाया योगिनी शुर्पणी मातृपितृछाया लीड घेई लिखाणात सारगर्भी योगिनी कुन्दनी मातृपितृछाया चैत्र वैशाख सत्यात न्हात ज्येष्ठा…
-
सयी सावळ्या – SAYI SAVALYA
पहा आरत्या झडू लागल्या तैल कावळ्या झरू लागल्या धवल पाकळ्या विणू लागल्या दले बावड्या भरू लागल्या श्याम श्वेत रंगात निसर्गी पीत जांभळ्या भिजू लागल्या आकुल व्याकुळ दुःख वेदना पहा पेटल्या जळू लागल्या नाकी कंकण इवले कुंदन विजय साजऱ्या करू लागल्या बघ वनदेवी मम माधुर्या गर्द पालव्या फुटू लागल्या करंज तेली बाया पोरी पुऱ्या कडकण्या तळू…
-
व्याक्रण – VYAKRAN
पार दराच्या ऊस टणक घटाहून मम मूस टणक धारा गोठून कोसळती मुसळासम पाऊस टणक गझल गुणाची मृदुल टिके रशियन व्याक्रण रूस टणक तूच तुझे घर पोखरले नारी नसते घूस टणक कालाब्द्धीसह अर्था जाण द्रव्यक्षेत्र अन कूस टणक अष्टापद कैलास गिरी नऊ रसांचा ज्यूस टणक बदल सुनेत्रा ठामपणे कायम नच होऊस टणक
-
टाच – TAACH
भरुन शेण मी सुधारलो ना बाप सायबा कोरोना की म्हणू करोना बाप सायबा डबल डबल म्या टीप मारुनी टाच लावली कसा फाटला चुकार कोना बाप सायबा शेतकरी मन उदासवाणे कधीच नसते म्हणत जाय ते होला होना बाप सायबा भांप बाष्प की वाफ म्हणावे गरम हवेला प्रश्न जिरवतो विचारतो ना बाप सायबा ग़ज़ल गुरू तो पढवून…
-
शिदोरी – SHIDOREE
राऊळाची वाट सुंदर नि सोपी कैवल्य चांदणे खिरे घनातून घाटातून वाट चढत जाऊया डोंगरी निर्झर खळाळे बागडे पुण्याची शिदोरी सोडून वाटून खाऊ घास घास आनंदाने ओंजळीने पाणी पिऊन तहान भागेल खरेच चला पुढे जाऊ राऊळ दिसले हात जोडले मी कळस झळाळे सूर्य किरणात चंद्रकोर बीज गगनात आली अंतरी शुद्धात्मा जिनदेव माझा राऊळी गाभारा घंटेचा निनाद…
-
कर्तव्य – KARTVYA
राजाचे कर्तव्यच लढणे पण भाटाचे गात राहणे पीत गुलाबी पाच पाकळ्या जलबिंदूंनी सजल्या भिजल्या उभी पाठीशी हिरवी पाने कळ्या किरमिजी भिजले गाणे भिजता गाणे वारा अवखळ वाहू लागतो झुळझुळ सळसळ सुगंध भिजला वाहून नेतो प्रीत फुलांची पेरून येतो
-
पटोला – PATOLAA
अबोली पटोला भरजरी पटोला नवलखे अलिकुले किनारी पटोला न घोला न अंचल निळाई पटोला गझल गझलियत स्वर जपावी पटोला गडद कुंकवासम शबाबी पटोला सळसळे शिवारी बहारी पटोला कनक जोडव्यांची नव्हाळी पटोला उन्हाळी फुलांची हळदुली पटोला हरित पल्लवीची मखमली पटोला निसुन्दी मनावर मुरुकुला पटोला न विंजन न वारा भरारी पटोला तराया तरोहण तराफी पटोला स्वरूनादबिंदे समाही…