-
ग्रीष्माची काहिली – GRISHMACHI KAHILI (Summer heat)
देहा अवघ्या तपवित आहे ग्रीष्माची काहिली पावसातही जाळे दाहे ग्रीष्माची काहिली हळूहळू उतरेल तप्तता भिजवुन गात्रे पुरी शीतल करण्या वारा वाहे ग्रीष्माची काहिली दवाच दे मज पथ्य नको पण म्हणते म्लान परी पुसते कारण स्वतःच काहे ग्रीष्माची काहिली शुद्ध निरामय आरोग्याची मिळे संपदा फुलां मारुन जंतू सत्यच पाहे ग्रीष्माची काहिली आजारीपण पळवुन लावुन नाचनाचुनी पुन्हा…
-
आड – AAD (well)
-
नामदेव – NAAMDEV (Name of marathi saint)
क्षमाशील संसद व्हावी जसे नामदेव क्षमाशील साधू जैनी तसे नामदेव संयमास धारण करुनी जिंकले कषाय क्षमाशील धरणी यक्षी असे नामदेव ठाकठोक केली निष्ठुर मूर्त बसवण्यास क्षमाशील कायेमध्ये वसे नामदेव शिव्याशाप त्यांचे त्यांना पावुदेत लक्ष क्षमाशील ओठी माझ्या बसे नामदेव संत मूळ धर्मी पावन दिगंबर नामी क्षमाशील नेत्री माझ्या ठसे नामदेव गझल मात्रावृत्त (मात्रा २३)
-
हाक मी मारू कुणाला – HAAK MEE MAROO KUNAALAA (to whom I will call)
हाक मी मारू कुणाला ज्ञात नव्हते अंतरी उमलूनही मी गात नव्हते माझियासाठीच रस्ता थांबलेला स्वच्छ इतुका पण पुढे मी जात नव्हते गरज होती एकमेका पाहण्याची त्याचवेळी मी तुझ्या नयनात नव्हते स्पंदने होती सुखाची गोठलेली दुःखही तेव्हा उभे देहात नव्हते हात मैत्रीचा धरावा एवढेही धैर्य तेव्हा भाबड्या हृदयात नव्हते कुरुप मी होते खरी की सुंदरी रे…
-
गोलच गोल – Round and round
-
शमा – SHAMA (beacon)
-
दे मला म्हणणार नाही – DE MALA MHANNAR NAHI (I DON’T SAY GIVE ME)
दे मला म्हणणार नाही घे तुला म्हणणार नाही गर्जणाऱ्या वारियाला कोपला म्हणणार नाही हुंदके जो गोठवी त्या स्फुंदला म्हणणार नाही जो रडी खेळे तयाला खेळला म्हणणार नाही डोलणाऱ्या लंबकाला मी झुला म्हणणार नाही लाट नाही ज्यात त्याला गाजला म्हणणार नाही जो न वेडा जाहला त्या रंगला म्हणणार नाही वृत्त – गा ल गा गा, गा…