-
अशी असावी दाद खरोखर – ASHI ASAVI DAD KHAROKHAR (“such should be the praise in truth”)
शस्त्र असूदे वार कराया प्रहार करण्या गदा असूदे स्वभाव अपुला सदैव जपण्या निर्मल ‘मी’पण सदा असूदे आत्मा ईश्वर वा परमेश्वर शुद्ध स्वभावी खुदा असूदे ढळू नये मम सम्यकश्रद्धा दुःख व्यथा आपदा असूदे ओळख नसते जरी कुणाची तरी वाटते ओळख आहे ओळख जपणे नात्यांमधली हीच खरी संपदा असूदे पुरे जाहले वृत्त घटविणे मोजित मात्रा शब्द पेरणे…
-
असाच वेडा पीर हवा – ASACH VEDA PEER HAVA ( want crazy devoted lover just like this..)
-
कोडे – KODE (puzzle)
-
आज मी नाहीच तेथे – AAJ MEE NAAHEECH TETHE ((“today,I am not there at all”)
श्वास त्यांचा मोकळा झाला परंतू… आज मी नाहीच तेथे जाणत्यांची वाहते भाषा परंतू … आज मी नाहीच तेथे फोडण्या नेत्रांस माझ्या लेखणीने… आंधळे सारे निघाले पोचले ते माझिया गावा परंतू … आज मी नाहीच तेथे वादळी मेघांपरी ते वर्षताना… मंदिरी वाजेल घंटा अंतरीचा नाद तो माझा परंतू… आज मी नाहीच तेथे गोठल्या आकाशगंगा गारठ्याने… गोठला…
-
विश्वचि अवघे माझे – VISHVACHI AVAGHE MAZE ((“the entire universe is my home”)
पानापानावर तरुणांनो लिहा स्वतःची गाणी आठवणींची फुले निरागस फ़ुलतिल पानोपानी दोनच पानामध्ये लपुनी कळ्या पाहती बागा फुलण्यासाठी तापतापुनी कधी न करिती त्रागा ऋतू कोणता आहे त्यांना घेणेदेणे नाही उमलुन येती हृदय उमलता बोलत काहीबाही सहज चुंबितो गूज सांगतो शीळ घालतो वारा अंबरातुनी रातराणिला साद घालतो तारा माझे माझे म्हणू कशाला विश्वचि अवघे माझे पुनव अमावस…
-
जमणार नाही- JAMANAR NAHEE ((it is not possible for me)
काळजाशी बोलल्याखेरीज माझ्या… मौन हे माझे तुला कळणार नाही … काळजाला हात मी घालू कशीरे … काळजाला दुखविणे जमणार नाही … काळजाला चुम्बते मी पापण्यांनी… वार करणे भिजविणे रुचणार नाही सरळ कर तू वार मी हटणार नाही… दाद दे! हा हट्ट मी करणार नाही… दाद द्यावी लोचनांनी आसवांनी… हलविल्याविन काळजा हलणार नाही सर अता येऊन…
-
चिरी – CHIREE (line of vermilon_
सुकुमार पाकळ्यांचे जाणून भाव काही रानातल्या फुलांचे घडवू जडाव काही लढण्यास आम जनता आहे तयार जेथे तेथे रणांगणी मी सोसेन घाव काही कुजणार संपदा ही येताच मोड त्याला मुलगी म्हणे पित्याला करते लिलाव काही भालावरी चिरी ती रेखून आज आली पाते तिला सुरीचे म्हणतात राव काही ज्यांच्यात हे पडोंनी होतात जायबंदी ते बुजाविण्यास खड्डे घालू…