-
माला -MALA
हात देण्या नेक ताली राहण्या त्यागिली मी ती रुदाली राहण्या सूर ठेका लय स्वराची साधना गालगागा गा गझाली राहण्या शांत जागा अंतराळी शोधली मौन कर्तव्ये खयाली राहण्या शांतता आत्म्यात माझ्या नांदते निवडली ऐसी प्रणाली राहण्या सत्य मी जाणे सुनेत्रा जाणती माळ माला माल माली राहण्या
-
हवाला – HAVALA
ठाम निश्चयी दृढतम श्रद्धा कशास पाळू अंधश्रद्धा दुजांवर ठेवूनी पाळत स्वतःसाठी कुणी खोदे खंदक बिनबुडाचे भांडे चुलीवर कशास नाटक व्यर्थ आगीवर निर्जरेस मज कर्मे माझी पराकडून ना घेते आंदण स्वार्थी लंपट मित्र नव्हे ते ते तर शत्रू तुटते बंधन लांछन बिंछन नाद कशाला मम कर्मांचा मला हवाला बदफैल्यांचा माज पोसुनी म्हणे सोवळा स्वतःस कोणी सोबत…
-
घटना ग्रंथ – GHATANAA GRANTH
पंचोळी … घटना घटना असुदे अथवा घट पट त्यांस असावा प्रकृतिचा तट मातीवर संस्कार करूनी घट संस्कारित कुंभाराच्या हाताचा आकार झेलूनी मृत्तिकेतले उपादान साकार जाहले… तीन शेरांचे मुक्तक ..ग्रंथ काल खेळली रंग लेखणी मस्त खरा आज चाटुनी कोप नाचरा फस्त खरा काय शिकविते गझल ओळखू सार बरे मित्र जवळचा ग्रंथ सत्य आश्वस्त खरा रंगवायला चित्र…
-
भोवरा – BHOVARA
अधीर मस्त नाचरा समीर मस्त नाचरा ..जमीन मतला अमीर मस्त नाचरा तरंग मस्त नाचरा … हुसने मतला उलगडुनी दले झुले गुलाब मस्त नाचरा बनात शीळ घुमवितो कबीर मस्त नाचरा उन्हात मेघ वर्षला सुशांत मस्त नाचरा नदीत भोवरा गळा जळात भृंग नाचरा उधाणता हवा तळी समुद्र मस्त नाचरा
-
किताब परडी लीड – KITAB PARDI LEED
मुक्तक … किताब धवल लाल दो गुलाब धवल गान मी रुबाब गझल गीत रुबाईत धवल दाम मम किताब … रुबाई .. परडी परडी फुले भरून हे पारडे झुकून म्हणतेय सु सकाळ आला चतुर्थ काळ .. मुक्तक .. लीड बोटी धरून लीड वारा भरून शीड गातेय गझल मस्त शेरात शीळ गस्त …
-
कौमार्य – KAUMAARY
मुक्तक ….. १) पंच-इंद्रिये जिवंतपण अंगात भिजविते ज्वलंतपण संगात भिजविते काया आत्मा पंच-इंद्रिये गोम्मटपण रंगात भिजविते मुक्तक २) अंग-अंग अंग अंग न्हाले सुगंध पेरण्या मृत्तिकेत रंग मिसळूनी काळा बाळ माती खाई नजर चोरून रसनेत रसा घोळूनी चाखण्या पंचोळी ३) कौमार्य साधेपण सौंदर्य जाण भो अंतरीचे माधुर्य जाण भो बुद्धीचे चातुर्य जाण भो ….. दर्याचे गाम्भीर्य…
-
भरते – BHARTE
समुद्रातले खारे पाणी मृगजळ लहरी फसवे पाणी दुःख मनीचे भरता नयनी गालावर कर्मांचे पाणी कृष्ण घनांना भरते येता जल आनंदाश्रूंचे पाणी तहानलेल्या मृगास फिरवी भ्रम दृष्टीचे कोरे पाणी लीड घ्यावया शिसे पचविते मम इच्छाशक्तीचे पाणी