-
कुजबुज – KUJ BUJ
गडगड गडगड मेघ गर्जती झुळझुळ झुळझुळ लहरी फिरती कडकड कडकड विजा तडकती झरझर झरझर धारा झरती सळसळ सळसळ पाने डुलती टपटप टपटप थेंब सांडती घरघर घरघर वारे दळती सरसर सरसर जलकण पडती खळखळ खळखळ झरे वाहती किलबिल किलबिल खग किलबिलती कुजबुज कुजबुज कलिका करती लदबद लदबद फळे लगडती चटचट चटचट मुले प्रकटती पटपट पटपट खात…
-
अत्तरदर्दी – ATTAR DARDEE
अक्षरातल्या कळ मंत्रांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या वारीच्या घाटात सुरांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या पुष्पपऱ्यांच्या हुंकारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या अत्तरदर्दी व्यापारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या मालवल्यावर समया साती देवघरातिल वेदीवरच्या खोल जलातिल अंधारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या मंदिरातुनी निनादणारा मधुर नाद घंटेचा ऐकत णमोकारमय नवकारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या शशांक उगवे बीजेचा अन ओवाळाया…
-
ऋषभदेव – RUSHABH DEV
अयोग्य काही केले मी जर जाणवले मजला स्वीकारुन मी केले सुंदर जाणवले मजला काळ्या काळ्या नेत्री काजळ घालुन मी बघता चांदण भरले जळले अंबर जाणवले मजला वृषभ जयाचे लांच्छन तो तर ऋषभदेव शंभू आदिनाथ पहिला तीर्थंकर जाणवले मजला सत्यशोधनासाठी होता पंचम काळी पण महावीराचा आत्मसंगर जाणवले मजला दवबिंदूंची स्फटिकमण्यांसम करी माळ येता शंकर शंकर जपतो…
-
दक्ष – DAKSH
शुद्ध आत्मा दक्ष “मी” मन न्हात येते जे हवेसे वाटते ते गात येते “आत्महित आधी करावे ” सांगुनीया मोरपीशी लेखणी हातात येते भय अता कुठलेच नाही देत ग्वाही काव्य सुंदर रंगुनी प्रेमात येते चांदणे कैवल्यरूपी बरसताना भावनांनी चिंबलेली रात्र येते वाचलेले दर्शनाने जाणलेले ज्ञान सम्यक चाखण्या पानात येते गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २१) लगावली – गागालगा/…
-
फँटसी – FANTASY
वाहती ओसंडुनी मम भावना हृदयातुनी प्रेमधन मिळतेच मज मग नाचऱ्या विश्वातुनी सुख मिळतेच मिळते ना उणे कोठे पडे जे हवे ते माझियावर बरसते जलदातुनी संकटे मज घाबरोनी पळुन जाती दूर रे जोडते नाते खरे मी धर्ममय वचनातुनी पाहते अन ऐकते मी साद माझ्या आतली कल्पनेतिल मस्त गोष्टी मिळविते गाण्यातुनी गझल गाणी आवडीची फँटसी स्वप्नातली माझिया…
-
मोसमी पाऊस – MOSAMEE PAOOS
मोसमी पाऊस यावा चिंब भिजवित माझिया गावात गावा चिंब भिजवित भिजविले मज घन घनाने प्रेमरंगी तो स्वतःही त्यात न्हावा चिंब भिजवित गझल माझी धुंदलेली नाचणारी गातसे तिचियात रावा चिंब भिजवित वीज जेव्हा करितसे सारथ्य मेघी वाजवी पाऊस पावा चिंब भिजवित तू अता ये..तू अता ये… पावसारे “मी” अता करणार धावा चिंब भिजवित गझल अक्षरगणवृत्त (मात्रा…
-
अकारादीक्षरा – AKAARAADEEKSHARAA
अरण्य भरले फळाफुलांनी वारा वाहे अः अः आठवणीतिल तळ्यात नावा तरंगणाऱ्या पहा पहा इमारतीतिल कैक सदनिका कैक उघडल्या रः रः ईश्वर केवलज्ञानी ब्रम्हा दिशादिशातुन दहा दहा उग्र तपाने प्राप्त मुनींना ऋद्धी सिद्धी मः मः ऊर्ध्वगति जीवास घेऊनी… चिंब पावसी नहा नहा ऋजुगति ऋजुमति सरळ सरल जे जाणायाला वः वः लृकार अक्षर सुवर्णकांती विघ्नविनाशक मः मः…