Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • आत्मतत्त्वी – ATMA TATTVI (“ONE WHO KNWS THE SUPREME TRUTH”)

    विकृतीशी युद्ध करते आत्मतत्त्वी लेखणी मी संस्कृतीला मुक्त करते आत्मतत्त्वी लेखणी मी अन्नदात्री मायभूमी तृप्त होउन गावयाला जैनियांना मुग्ध करते आत्मतत्त्वी लेखणी मी ऐतिहासिक दस्तऐवज नेटवरती जतन करण्या गाळशाई शुद्ध करते आत्मतत्त्वी लेखणी मी ललित साहित्यात आणुन पारिभाषिक शास्त्रसंज्ञा गंड सारे लुप्त करते आत्मतत्त्वी लेखणी मी साठल्या पाण्यात जंतू वाढल्यावर ऊन्ह बनुनी दलदलीला शुष्क करते…

    October 10, 2017
  • सल्लेखना – SALLEKHANA (SPIRTUAL GOAL)

    अपराजिता सिद्धायिका निष्कामचंडाली नवी बाणेश्वरी धनुरासनी भृकुटी परी पद्मावती वीवा विवी बाणेश्वरी छेडीत वीणा ग्रंथ घागर नीर भरली सांडते डोईवरी स्वर्गातुनी आली शिवा हृदयातुनी देते शिवी बाणेश्वरी चक्रेश्वरी गरुडावरी बिजलीपरी शंखास फुंके अंबरी लक्ष्यावरी ठेवून डोळा भेदते केंद्रा कवी बाणेश्वरी कोरावई कुसुमांडिनी रक्षावया सृष्टीस ज्वालामालिनी लंघून कक्षा झेलते भाळावरी जळता रवी बाणेश्वरी सल्लेखना घेता बला…

    October 9, 2017
  • उठाठेव – UTHAATHEV (MEDDLING)

    कोण पोचले कोणाआधी हिशेब असले तूच ठेव ग तुझ्या हिशेबांचे वारांचे, कधीच नव्हते मला भेव ग अतिथी देवासमान असतो, तुला न कळला हा व्यवहार निश्चय जाणुन व्यवहारातिल भुकेल्यातला पहा देव ग काजळणे कुढणे घुसमटणे, यातुन मुक्ती मिळावयास घनतिमिरातिल समईमधल्या फुलवातीसम शांत तेव ग लष्करच्या भाकऱ्या बडविणे, जगण्यासाठी अवघड फार त्यापेक्षा तू अर्धी चतकुर राखुन भाकर…

    October 6, 2017
  • स्थापना – STHAPANA (FOUNDED IN)

    वर्णमातृकेतिल स्वर सारे जमले सजले तबकामध्ये विरामचिन्हांचे दवबिंदू शुभ्र सांडले तबकामध्ये दहा दिव्यांनी उजळुन जाता दहा दिशातिल अनंत वाटा स्वरात मिसळुन व्यंजनाक्षरे शब्द उमलले तबकामध्ये नीर सुगंधी अक्षत पुष्पे काव्यशर्करा अंतर दीपक धूप चंदनी श्रीफल कळसा नीटस भरले तबकामध्ये केशर हळदी कुंकुम वर्णी तिलक रेखुनी मम भाळावर बिंबाचे प्रतिबिंब सुदर्शन झुकुन घेतले तबकामध्ये पंचपरमपद परमेष्ठींचे…

    September 30, 2017
  • महती – MAHATEE (IMPORTANCE)

    हित मित प्रिय अन सत्य गुरूची वचने टिपते मी दशधर्माची महती कळण्या कवने रचते मी ऊद धूप कर्पूर जाळुनी लावुन दीप दहा प्रकाश आणिक परिमल यांनी भवने भरते मी पूर्वभवांच्या उकलुन गाठी धागा सरळ मिळे असले धागे धुते सुकविते वसने विणते मी ध्यानाग्नीने राख व्हावया निजगत कर्मांची जिनाबिंबा अंतरी स्थापुनी नयने मिटते मी काव्यफुलांची ओंजळ…

    September 30, 2017
  • जान – JAAN (LIFE)

    आपट्याचं पान सोन्याची खाण आपट्याचं पान शेवाळी वाण ओरबाडु नका आपट्याचं रान आपट्याचं  रोप किती किती सान आपट्यास जपू वाढाया छान आपट्याचं झाड बागेची शान वृक्ष वल्लरीत सृष्टीची जान

    September 30, 2017
  • डोरले – DORALE (ORNAMENT)

    पर्व दशलक्षण दिगंबर जैनियांचे थोरले मी त्याचसाठी भावनेतिल अर्थ सुंदर खोरले मी साधका आत्माच साधन शुद्ध निर्मल जाणल्यावर मम मनाच्या आगमातिल शब्द दडले चोरले मी भूक्षमा अन मार्दवादी धर्म दाही पाळणाऱ्या भूतकालिन मुनिवरांचे शिल्प दगडी कोरले मी भक्तिपूर्वक अष्टद्रव्ये अर्पिल्यावर जिनप्रभूला शांतता मजला मिळाली झोपल्यावर घोरले मी ज्ञान श्रद्धा शील सम्यक पाच शेरांची गझल ही…

    September 26, 2017
←Previous Page
1 … 115 116 117 118 119 … 290
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya