-
सूत्रबंधनी श्लोक- SUTRA BANDHANI SHLOK
धो धो हसण्या खळखळुनी जन निरोग निर्मल जोक हवा सृष्टीचे गुणगान गावया स्वर सैराटी झोक हवा अज्ञातातिल स्वर्ग सुखे या मनास नच रे लोभवती इथल्या बांबू बनात फिरण्या हवा हवा इहलोक हवा शौक भू वरी मम जीवाला ऊर्ध्व गतीचा जरी जडे स्वतः स्वतः झरणारा निर्झर शोक मुक्त निर्धोक हवा स्वरानुभूतीतिल तत्त्वार्थी चिंब भिजवुनी गाणाऱ्या पाठीवर…
-
समर्थ -SAMARTH
मातृ पितृ धर्म ऐक्य सहज लक्ष्य आहे माझिया करात फिरवण्यास अक्ष आहे साक्ष द्यावयास आस श्वास हजर असता तोलण्यास शब्द अर्थ भाव दक्ष आहे बोलती जरी असत्य सत्य त्यास म्हणती वादळात कातळी तटस्थ वक्ष आहे कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष सौरवर्ष सांगे कोणता खरेच नित्य शुद्ध पक्ष आहे मी समर्थ रक्षिण्यास आत्मधर्म माझा प्रार्थनेत पण तुझ्याच…
-
अलकनंदा – ALAK NANDA
आनंद कंद बाणा चित्रात मंजुषेच्या ज्योती समान गाथा चित्रात मंजुषेच्या आहे प्रवीण दुहिता..नृत्यात अलकनंदा गाते सुरेल माया चित्रात मंजुषेच्या उत्फुल्ल रंजनेने घनदाट कुंतलांवर बघ माळलीय फांती चित्रात मंजुषेच्या ओढाळ माधुरीला रेखा कशी कळावी आहे निमात नीती चित्रात मंजुषेच्या संध्येस स्वप्न भारी फिल्मी नवी सुजाता स्वातीस मोतिमाला चित्रात मंजुषेच्या कविता न चारुशीला आकाश नीलिम्याची मधुमास चांदण्यांचा…
-
उधारी – UDHAARI
मादक ओठांवरची मदिरा प्राशायाला हवी झिंग तयातिल चालीमध्ये मुरवायाला हवी स्पर्शाने मम उसळुन येता तव इच्छांचे नीर दो हातांनी लाट रुपेरी अडवायाला हवी मधुर गुपित चिरतारुण्याचे कळण्या मजला खरे तव नजरेतिल तडका मिरची चाखायाला हवी मिटशिल जेंव्हा नेत्रदलांना श्यामल तनूवरचे.. साठवुनी दव त्यातच मेंदी भिजवायाला हवी कुणास वाटे चोरी मारी असली तरही गझल.. कल्पकतेची म्हणे…
-
धैर्यशाली – DHAIRYASHALI
काजळीने काजळे ना रात आता खुट्ट होता हलत नाही पात आता त्या दिव्यांची जात नाही माळण्याची माळती पणत्या खुशीने वात आता झोपती बाळे सुखाने शांत चित्ते अंधश्रद्धा रडत नाही गात आता काय सांगू भोवतालीच्या बघ्यांना दैव घडवे धैर्यशाली हात आता वात कोमल कापसाची मम सुनेत्रा तूप साजुक भिजविते स्नेहात आता
-
कळ – KAL
पल्लवित मन झाले तरुचे सुमन सुकले काळे तरुचे भाव घन अंबर धर नभ हे थोपवित शर भाले तरुचे वाऱ्यात सळसळत्या पाती वाजतात ग वाळे तरुचे दवबिंदूं चे करित शिंपण पूजन अर्चन चाले तरुचे काव्य कळ मी जलद सुनेत्रा सहज उघडे टाळे तरुचे
-
पुद्गला – PUDGALA
लीड घे ती म्हणाली घेऊन ठेवले टोक तुटता त्वरेने पकडून ठेवले तासुनी ब्लेडने पेन्सीलीस कैकदा टोकयंत्रात हलके फिरवून ठेवले संपता क्षुद्र साऱ्या भोगून वासना साबणाच्या जळी त्यां भिजवून ठेवले पुद्गलाचे सुबकसे नाजूक खेळणे खेळुनी खेळवूनी मांडून ठेवले आठवांच्या सुनेत्रा सायीस विरजुनी अर्थ लोण्याप्रमाणे कढवून ठेवले वृत्त – अभयकांती लगावली – गालगा/ गालगागा/गागाल/गालगा/