Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • धुनी – DHUNEE(SMOKE)

    कृष्ण निळ्या घनमाला गगनी कपोत वर्णी ढग काळे तप्त मृत्तिका तहानलेले धावधावती मृग काळे झुळझुळणारे जल आभासी आतुरलेली वसुंधरा दूरदूरवर क्षितिजावरती फिरत राहती खग काळे वळिवाची चाहूल न देता दिशा बदलली वाऱ्याने कोसळण्या भूवरी सागरी मेघ दाटले मग काळे संवादाविन युद्ध पेटता कारण कुठले कळे कुणा धुनी समुद्री मार्गावरती दिसू लागले जग काळे मुसळासम अंतरास…

    March 23, 2026
  • घळस – GHALHAS(TO EARN)

    काहून भावनेची किळस वाटते आहे झुंजार वासना पण पळस वाटते आहे अंगणी औषधी तरु तुळस वाटते आहे काफिया कन्नड मिळव ‘घळस’ वाटते आहे पाण्याविना धरेचे देऊळ तापलेले वरती घागर उपडी कळस वाटते आहे बन ‘बळगार’ कासार प्रीतिचे पीक घेण्या मी शब्द कानडी बघ ‘ब्यळस’ वाटते आहे भांडार भरुन वाहे कसले उणे “सुनेत्रा” मुरवण्यास साखरेत फळस…

    March 19, 2026
  • अंगठी – ANGATHI(RING)

    मून चंद्रमा नवमीचा कुंदन गरिमा नवमीचा अंबरातल्या घननीळा गडद रक्तिमा नवमीचा उखळ पांढरे शुभ भावे कांड अस्थमा नवमीचा झील चांदवा प्रतिबिंबी कृष्ण काळिमा नवमीचा अंगठी बदाम “सुनेत्रा ” घाट नीलिमा नवमीचा

    March 12, 2026
  • भाषा – BHASHA(LANGUAGE)

    संग ठरवण्या आधी बोले अरेतुरेची भाषा तयांस उलटे देते टोले अरेतुरेची भाषा अनोळख्यासम जरी भेटली कपट जाणते अंतर दांडूने करकचून कोले अरेतुरेची भाषा फुकट घरगडी मिळतो जेव्हा फिरावया बाजारी सवंगड्यांसह डाळिंब सोले अरेतुरेची भाषा नऊ नव्याचे दिवस सोंग ते हाव अहं जड भारी शिवून खोळी भरून तोले अरेतुरेची भाषा शील ज्ञान गुण सेवा यांची असे…

    March 10, 2026
  • बंगला – BANGLA(BUNGALOW)

    लावली मेंदी न हळदी रंग चढण्या उतरण्याचा प्रश्न नाही भाव नयनातून झरती मज कुणीही रडवण्याचा प्रश्न नाही बिघडवू दुसऱ्यांस का मी बिघडुनी घडले स्वतः मी वेळ येता खुद्द माझ्या लेकरांना घडविले ना बिघडण्याचा प्रश्न नाही माणसांच्या साखळीने बंगला ना लाटण्याचे स्वप्न माझे आपले झाले खुशीने तेच सच्चे अडवण्याचा प्रश्न नाही नोकरी धंदा कुणाचा कोण करती…

    March 5, 2026
  • जिनबिम्ब – JIN BIMB(IMAGE OF LORD JIN)

    मुक्तक … जीव जीवात आहे रंग लावायचे रंग खेळायचे वय सरून गेले जीव जीवात आहे आतले भय सरून गेले धर्म कर्मात माझ्या खरा जाणते मी मला “सुनेत्रा” देव हृदयी जपायास कांडातले मय सरून गेले गझल गज़ल पहिली ओळ मराठी .. दुसरी ओळ हिंदी ….. पुष्प गजरा गझल चंचल गा रहा है पवन चंचल मृत्तिकेतिल दलदलीने…

    March 4, 2026
  • शब्दशर – SHABD SHAR( WORD ARROW)

    बासुरीमे कलम रख दे कडक परखड शब्दशर दे कौनसी असली अलामत ओळखाया सत परख दे गज़लियत पर काफिया स्वर जाणता आत्मा अलख दे लाखसे भर हुट्ट बाटी सूत काताया चरख दे सहज मेरे कर्म छूटे निर्जरा मैत्री निखळ दे पलक पायल छेड़ सरगम शांत जगण्या श्वास दम दे मोक्षमुक्तीका “सुनेत्रा” मार्ग हृदयी मम धवल दे

    February 27, 2026
←Previous Page
1 … 14 15 16 17 18 … 290
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya