काहून भावनेची किळस वाटते आहे
झुंजार वासना पण पळस वाटते आहे
अंगणी औषधी तरु तुळस वाटते आहे
काफिया कन्नड मिळव ‘घळस’ वाटते आहे
पाण्याविना धरेचे देऊळ तापलेले
वरती घागर उपडी कळस वाटते आहे
बन ‘बळगार’ कासार प्रीतिचे पीक घेण्या
मी शब्द कानडी बघ ‘ब्यळस’ वाटते आहे
भांडार भरुन वाहे कसले उणे “सुनेत्रा”
मुरवण्यास साखरेत फळस वाटते आहे