-
वेंधळी – VENDHALEE
चंद्रावरी हे पोचले ते मंगळाशी भांडले असुनी कुरूप नि वेंधळी मजलाच त्यांनी निवडले येताच त्यांच्या आड तो सूर्यास त्यांनी रोखले नक्षत्र ताऱ्यांना कसे भंडावुनी मी सोडले होते किती मतिमंद ते वातात कोणी बरळले गर्विष्ठ मी आहे जरी बारा कसे ना वाजले सांगा सुनेत्राला खरे म्हणताच का ते कोपले वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली –…
-
तीळपोळी – TEEL POLEE
बाभूळ छाया लांबली काट्यांसवे शेफारली मउ तीळपोळी सानशी साऱ्यांमधे मी वाटली सैलावली अभ्रे नभी पाठीवरी मी टाचली गालावरी पडता खळी तो न पण ती लाजली माझी न त्याची ती परी त्याचीच वाटे सावली गौरीपरी हिमगौर ती आहे छबेली बाहुली माझी सुनेत्रा वासरी टोचून काटे फाडली वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल…
-
पावित्र्य – PAAVITRYA
त्या लाडक्याला संपवू अन दोडक्याला गोठवू आभाळमाया दाटली मायेस तिचिया आठवू झोळीतल्या तान्ह्यासवे त्या द्वारकेला जोजवू आकाश आता मौन ना त्यालाच पुन्हा पेटवू आकाश जेव्हा बरसते त्यातील ठिणग्या साठवू काया जरी ती नागडी पावित्र्य त्यातिल दाखवू तृष्णा सुनेत्रा ना जरी हृदयास कोमल गाजवू वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा…
-
पुस्तके – PUSTAKE
मूर्तीस त्या पाहून ये नागासवे डोलून ये ज्या घातल्या शपथा तुला त्या सर्व तू माळून ये जी पुस्तके मी वाटली ती पूर्ण तू वाचून ये अभिषेक तू केला जरी ती नग्नता जाणून ये जे बांधती तुज सारखे ते हात तू बांधून ये जे पत्र तू नाही दिले पत्रास त्या घेऊन ये जे रंग माझे लपविले…
-
भारत भूमी – BHARAT BHUMEE
कंकण बिलवर करी धरेच्या सुवर्णगर्भी हिरवे सुंदर सतेज भालावरती कुंकुम आभाळीचा सूर्य शुभंकर हृदय धरेचे भारत भूमी शुद्ध जलाने तुडुंब भरले पर्वत रांगा पाय पाऊले तयाभोवती तळ्यात कमळे कडेकपारी पंचेंद्रिये हात जणू या घन वनराई हास्य तिचे जणू पुनव चांदणे शुभ्र फुलांसम ठाई ठाई धबधबणारे प्रपात म्हणजे वस्त्र तिचे मोत्यांसम धवला शुभ्र हिमालय मुकुट मस्तकी…
-
तथास्तु – TATHAASTU
उधाणल्या सागरात तारू अजून माझे टिकून आहे सुन्या तुझ्या भैरवीत कोणी उदासवाणी बसून आहे दहा दिशा मोकळ्या मला या खुणावतो आसमंत सारा नभात अभ्रे फुलून येता तयामधे मी भरून आहे तहान तृष्णा तुला तिलाही कुण्या सुरांची तिलाच ठावे मुक्या मुक्या लावणीतला हा तरूण ठेका रुसून आहे तुझे नि माझे अगम्य नाते कुणास बेडी कुणास कारा…
-
चेरी – CHERRY
चुटूक लाली तव अधरांची टिपून घेते रसाळ चेरी सुरभित रसमय गऱ्यास खाण्या तुला खुणविते खट्याळ चेरी अनंत बागा धरेवरी या फुला-फळांच्या फुलून भरल्या भरून येण्या तव रसवंती मधाप्रमाणे मधाळ चेरी तुझ्या मनातिल तरंग कोमल वहात जाण्या नदीकिनारी रदीफ मोहक मम गझलेचा जणू कमलिनी दवाळ चेरी टपोर माणिक जणु पदरावर तशीच बसते सजून पानी कितीक खोड्या…