-
सायंकाळी निळ्या नभात – SAAYANKAALHEE NILHYAA NABHAAT
सायंकाळी निळ्या नभात पाखरे जेव्हा उडत जातात अनिलांच्या दशपदीतले कानेमात्रे जिवंत होतात…. परसदारी जास्वंदीवर लाल फूल डोलू लागतं हृदयतळातून वर येऊन प्रेम तुझं डोलू लागतं…. प्रेम तुझं खरंच होतं पण तुला बोलवत नव्हतं पण मला आता वाटतं मौन तुला आवडत होतं …. मी तू . . तू मी… करत कधीच बसले नाही म्हणून धूळ केर-कचरा…
-
झोपेल बाळ शांत – ZOPEL BAALH SHAANT
चल ये लिहूत गझला …… …… दोघे मिळून आता ही पायवाट ओली ———– भिजवू दवात आता … वाटेवरी दुतर्फा टाकू बिया फळांच्या जपतील पादचारी अंकूर नवतरूंचा … वाढून उंच झाडे झुलतील वारियाने फांदीवरी बसोनी गाऊत प्रेमगाणे … येतील पाखरे मग बांधावयास घरटी किलबिल ऐकुनीया रचतील कोण गोष्टी … छायेत गर्द झोपे पान्थस्त सावलीला होताच सांज…
-
वृत्त देखणे – VRUTT DEKHANE
वृत्त देखणे फक्त नसावे वृत्तीसुद्धा हवीच सुंदर गझल असूदे जीर्ण जुनी मम नित्य भासते नवीन सुंदर प्रभातसमयी शुभ्र मोगरा तप्त दुपारी जास्वंदीसम सायंकाळी गझल चमेली उत्तररात्री शिरीष सुंदर काव्य चित्र अन शिल्पामधुनी मूर्त कुणी नारीला करिते त्याहुन मोहक लेक आपुली गझल बावरी सजीव सुंदर आकाशाची निळी पोकळी सौरमंडळे ग्रह ताऱ्यांची पृथ्वी म्हणजे ग्रहगोलांतिल गझल क्षमाशिल…
-
अंक – ANK
अंक सर्व मज आवडती नाही कुठला नावडता ओळख करुनी घेते मी त्यांच्याशी जाता जाता.. शून्य शून्यमय विश्वाचा एक आपुल्या जीवाचा दोन जीव नि अजीवाचा तीन खऱ्या ‘रत्नत्रय’ चा चार चार पुरुषार्थांचा पाच पंच परमेष्ठींचा सहा सहाही द्रव्यांचा सात असे सत-तत्वांचा आठ अष्टमूलगुणांचा नऊ नवरसी काव्याचा दहा पर्व दशधर्माचा… जीवांच्या कल्याणाचा धर्म अहिंसा विश्वाचा…
-
संक्रांति बाई – SANKRAANTI BAAEE
आली आली संक्रांति बाई.. जणू मोहक जाई जुई… कंकणे वस्त्र तांबडे लाल हातात धरला सुगंधी बेल रथात बैसली मांडीवर मूल सारथी शेजारी हाई चंपक जाई जुई.. रागिणी संक्रांति बाई… भाळावर गोल टिळा लावुनी जात नारीची जनां सांगुनी तृप्त होतसे क्षीर पिऊनी कुंभ धारिणी ताई मोगरा जाई जुई.. मानिनी संक्रांति बाई… नक्षत्र हाय मोहोदरी वायव्य दिशेला…
-
तुला प्राशुनी मी – TULAA PRAASHUNEE MEE
तुला प्राशुनी मी, तुझे रंग ल्यावे, जिवा ध्यास होता,अता पूर्ण व्हावा,असे वाटते रे तुझे अंग माझ्या, जलौघात न्हावे, जिवा ध्यास होता, अता पूर्ण व्हावा,असे वाटते रे कुठेही असूदे, मनाला दिलासा, खरी तूच गझले, तुझी मूर्त माझ्या, समोरी असावी तुझ्या लोचनातील काव्यास प्यावे, जिवा ध्यास होता,अता पूर्ण व्हावा, असे वाटते रे तुझा भास होता, उगा लाज-लाजून…
