-
शेष – SHESSH
रंगले जरी कधी रंग ना मी उधळले फक्त प्रेम ठेवुनी शेष काही विसरले तुझ्याच आठवात मी दंगले पुन्हा पुन्हा तुलाच शोधले पुन्हा जरी कधी हरवले फुलापरी हसत मी चालले तुझ्यासवे घसरता चुकून पाय हात फक्त पकडले पुरेच खेळ हा सख्या कोसळू अता पुरे म्हणत म्हणत मी तुला हळूहळूच बरसले नाव मी तुझे खरे जपून ठेवले…
-
मल्हार राग गाऊ – MALHHAAR RAAG GAAOO
डोळ्यात साठलेला घनगर्द भाव पाहू मेघात दाटलेला मल्हार राग गाऊ उडवीत मृत्तिकेला वाहील मस्त वारा जलदातुनी सुखाच्या वर्षोत प्रेमधारा नाचोत पंचभूते देहात कोंडलेली तुटूदेच साखळीही हृदयास काचणारी हातात हात घ्यावा तू नाचऱ्या विजेचा कर श्वास मोकळा तू मौनातल्या धरेचा ही वीण घट्ट मी ची उसवेन मी स्वतःही आभाळ बरसता हे बरसेन मी स्वतःही
-
सा रे ग म प ध नी सा – SAA RE GA MA PA DHA NEE SAA
सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा जीव म्हणे म्हण गाणे गात जाय घन गाणे रातराणि फुल वाती काजव्यात फुलताती समईच्या दीप कळ्या बघुनीया तम पळे वाट जरी वळणाची ओळखिची चढणीची गात गात घाट चढे रानातुन जाय पुढे सा रे ग म प ध नी सा…
-
उनाड – UNAAD
सांग मला भेटण्यास त्या उनाड पारव्यास अंतरात साठवून प्रेम उतर नाचण्यास ये इथेच राहण्यास पावसास पाडण्यास भीत नाय मी कधीच आषाढी गारव्यास भाग पाड लबाडास खरे तेच बोलण्यास मोल असे जाण अता गात गात खिदळण्यास जन्म घे पुन्हा पुण्यात सुनेत्रास हरवण्यास
-
यंत्रयुग हे ते – YANTR YUG HE TE
पोट झडाया डोकयंत्र हे ते सोकविण्या मन सोकयंत्र हे ते टोक कराया टोकयंत्र हे ते पाठ कराया घोकयंत्र हे ते विनोद सांगे जोकयंत्र हे ते हळू टोचण्या पोकयंत्र हे ते नशा यावया झोकयंत्र हे ते चोप द्यावया फोकयंत्र हे ते मागे ओढी ढोकयंत्र हे ते इंजिन पळवी कोकयंत्र हे ते दिशा सांगण्या होकयंत्र हे ते…
-
कीर्द खतावणी – KEERD KHATAAVANEE
कुणी कुठून आणली कीर्द खतावणी फुका पुसे खडूस बोचरे प्रश्न असे तसेच का हवीस तू मला गडे बोलतसे फुलास तो अशाच सांगुनी कथा रमवतसे स्वतःस का कधी उशीर जाहला फी तुज द्यायला मला उगाच चौकशा करी सांग मिळे पगारका हिशेब छान शिकविले शिस्त जरी कडक असे हुशार मी खरी खरी जाणुन गोष्ट मौन का गुरूपणा…
-
बाकी – BAAKEE
काय राहिले सांग प्रियतमा लिहावयाचे बाकी किती राहिले पत्थर अजुनी भिजावयाचे बाकी दगडावरती साठत गेली बांधावरची माती बोल केवढे अंकुर आता रुजावयाचे बाकी कैक भरवल्या खतावण्या तू लिहून भाकड गोष्टी पात्र कोणते कथांतल्या त्या रडावयाचे बाकी चंचलपण तव नकोस मिरवू उघड चंचले चंचू उकरुन माती टाक पुरून जे पुरावयाचे बाकी पोपटपंची नको नाटकी पूस ‘सुनेत्रा’…