सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • साखर झोप – SAAKHAR ZOP

    कोकिळ गाई पहाट गाणे साखर झोपी तरल तराणे स्वप्न पाहती कुणी दिवाणे जगण्यामधले ताणे बाणे कवीच करतो त्यास शहाणे मुदित होऊनी शीक पहाणे आणिक हल्लक होत वहाणे नको करू रे व्यर्थ कुटाणे विक हवे तर चणे फुटाणे गाता गाता जीवन गाणे

    April 29, 2014
  • टक्के टोणपे – TAKKE TONAPE

    खा टोणपे नि टक्के उडवून लाव धक्के कर काम तू अता रे जप ओळखी स्वतः रे कोणास कोण तारी अपुल्याच त्या सतारी आहेत खूप भारी

    April 29, 2014
  • ऊन काहिली – UOON KAHILEE

    ऊन काहिली थंड कराया पाऊस गाणी झरती चला जाऊया सैर कराया डोंगर माथ्यावरती कुदळ फावडे घेऊन हाती हात आमुचे खणती तण उपटूया खड्डे करूया खांब रोवण्यासाठी भूमी मापन अचुक करूया घेऊन हाती काठी घाम गाळूया माती भरुया धावू वाऱ्यापाठी मडके भरुया सडा शिंपुया  जमीन करण्या ओली लांबी रुंदी उंचीसंगे भरून टाकू खोली कुंपण गर्द कराया…

    April 29, 2014
  • कशाला या उठाठेवी – KASHAALAA YAA UTHAATHEVEE

    कशाला या उठाठेवी, जना सांगावया काही उठा बोला मना सांगा, लिहाया लीलया काही कुणी नाहीच मोठारे, तसा नाहीच छोटाही अता छोटे बनूयाहो, बरे बोलावया काही कशी भाषा फुलावी रे, असे हे मौन लोकांचे जरा भांडा स्वतःशीही, चुका टाळावया काही नवी गीते रचू गाऊ, क्षमेने क्रोध जाळूया अहिंसा धर्म जीवांचा, खरा जाणावया काही करूया शांत पृथ्वीला,…

    April 28, 2014
  • पुरे जिवाशी खेळ खेळणे – PURE JIVAASHEE KHEL KHELANE

    पुरे जिवाशी खेळ खेळणे काठावरुनी ऋतू जाणणे आषाढातिल मेघ पालखी फाल्गुन अस्सल रंग पारखी आश्विन मासी धवल चांदणे वैशाखाची कनक झळाळी कार्तिकातली जर्द नव्हाळी पौषामधले गगन देखणे चैत्र फुलोरा मृदुल पालवी भाद्रपदातिल ऊन सावली ज्येष्ठामध्ये आत्म पाहणे मार्गशीर्ष मोहक मनभावन गुलाबजल शिंपाया श्रावण माघामध्ये निवत तापणे

    April 27, 2014
  • घेऊ थोडी – GHEOO THODEE

    मुस्तज़ाद गझल कधीच नाही जरी घेतली      घेऊ थोडी भरून प्याले तरी झेपली      घेऊ थोडी दिल्यास तू ज्या जखमा मृगजळ      करिती खळखळ नाद ऐकुनी नशा पेटली      घेऊ थोडी करावयाला जशी साठवण      तुझी आठवण दिव्यात भरता वात तेवली      घेऊ थोडी पैशांची या मिटण्या चणचण      केली वणवण थकल्यावरती पाठ टेकली      घेऊ थोडी उपवासाने गळून गेली      पूजा केली करुन…

    April 26, 2014
  • तिरंगा – TIRANGAA

    अधरांवरती असेल शिट्टी हातामध्ये घड्याळ झाडू अचूक समयी भारतभूवर भ्रष्टाचारा उखडू जाळू खांद्यावरती धनुष शिवाचे भात्यामध्ये बाण अक्षरी हृदयमंदिरी सदा तिरंगा हीच असूदे सही स्वाक्षरी तळ्यात कमळे बघत धावते इंजिन पाठी झुकझुक गाडी दिडदा दिडदा गात फुलविते शेतमळे अन हिरवी झाडी स्वार्थांधांना धूळ चारण्या मानव सारे एक होउया जीव शृंखला टिकण्यासाठी आत्म्याचे संगीत ऐकुया स्वभाव…

    April 24, 2014
←Previous Page
1 … 187 188 189 190 191 … 273
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya