-
किरण मंजिरी – KIRAN MANJIREE
जाळीतुन पानांच्या उमले किरण मंजिरी सळसळणारी रविकर कुलकर करिता करणी झुळुक गुंजते झुळझुळणारी सुनेत्र उघडी भास्कर दोन्ही मिटते डोळे लज्जित अवनी नयनांमधुनी सुरेख वर्षे मुक्त निर्झरा खळखळणारी
-
मजा – MAJAA
जाण आता खरी ताणण्याची मजा ताणता ताणता जाणण्याची मजा ज्यास कळते पुरी लांबण्याची मजा त्यास भावे न ती खेचण्याची मजा ढील आता कशाला हवी रे तुला घे नभी वावडी काटण्याची मजा थंड ओठांवरी ठेवुनी ओठ तू लूट बर्फामधे गोठण्याची मजा सांग कारे तुला ना कळाली कधी जिंकुनीही रणी हारण्याची मजा वृत्त – गा ल गा, …
-
माझा वसा – MAAZAA VASAA
बोलण्याचा खरे मी वसा घेतला जोडण्याचा घरे मी वसा घेतला बंद दारे तुटोनी हवा यावया मारण्याचा छरे मी वसा घेतला कातळाला फुटाया नवी पालवी खोदण्याचा झरे मी वसा घेतला कैक काटे फणस खोबरी सोलुनी काढण्याचा गरे मी वसा घेतला दोन रेखावया नेत्र दगडावरी पाडण्याचा चरे मी वसा घेतला वृत्त – गा ल गा, गा ल…
-
ट चे गाणे – TA CHE GAANE
ट ट टमटम म्हणतेय कम कम टा टा टाटा दावतेय वाटा टि टि टिमकी भलतीच खमकी टी टी टीका करायला शिका टु टु टुकटुक बास झाली चुकचुक टू टू टूम पळाली धूम टे टे टेकू लावायला शिकू टै टै टैया अगो बैया बैया टो टो टोप जा आता झोप टौ टौ टौका डोलतिया नौका टं…
-
गीत – GEET
गीत गावे लिहिता लिहिता ते रचावे गाता गाता भाव भरण्या त्यात सुंदर पांघरावे नील अंबर अंबरातिल मेघ झरता ते रचावे गाता गाता अर्थ तो जाणून घ्यावा गोड ही मानून घ्यावा पाहण्याला त्यात आत्मा ते रचावे गाता गाता गीत गावे लिहिता लिहिता ते रचावे गाता गाता
-
जगण्याचा उत्सव – JAGANYAACHAA UTSAV
मी माझ्या जगण्याचा उत्सव तू माझ्या फुलण्याचा उत्सव आठवणी रंगात बुडवुनी प्रेमाने खुलण्याचा उत्सव रिक्त जाहल्या धरणांमध्ये तुडुंब जल भरण्याचा उत्सव मोद वाटुनी मुदित होउनी खळखळुनी हसण्याचा उत्सव काव्यसरींच्या धारांमध्ये चिंब चिंब भिजण्याचा उत्सव मात्रावृत्त (८+८=१६ मात्रा)
-
निसर्ग – NISARG
गोड फळांचा रस मिळवाया हृदयामध्ये हवीच गोडी आख्खा आंबा मिळूदे अथवा स्वच्छ बशीतून खाव्या फोडी संत्री बोरे चिक्कू द्राक्षे केळी पेरू अननस नारळ डाळींबाचा रस अमृतमय मधुमेहावर औषध जांभुळ फळे मिळाया झाडे लावू निगराणीने तया वाढवू निसर्ग जपण्या आणि फुलवण्या मनामनांतिल प्रेम जागवू