-
आले वर्ष नवे आले – AALE VARSH NAVE AALE
आले वर्ष नवे आले आले वर्ष नवे आले… रवि किरणांचा कनक पिसारा उजळुन टाकी परिसर सारा फुलवित शेत मळे… पुष्प सुगंधित बाग जाहली चिंता साऱ्या मिटवुन फुलली मोजित घटका आणि पळे… आले वर्ष नवे आले आले वर्ष नवे आले…
-
वीसचौदा – VEES-CHOUDAA
आले नव्या क्षणांचे दमदार वीसचौदा ठोकेल पार क्षितिजी षटकार वीसचौदा गेले खिरून झरुनी बिंबात वीसतेरा गाठून मंगळाला येणार वीसचौदा हृदयास शुभ्रवर्णी छेडून तार जाता रंगात लक्ष सुंदर भिजणार वीसचौदा नाचे मयूर रानी फुलवून मोरपीसे त्यातील पीस आहे अलवार वीसचौदा काटे किती जुने ते असुदेत टोचणारे काढून त्यांस जखमा भरणार वीसचौदा फुलपाखरी मनाची स्वप्ने खरी कराया…
-
सरेल रात गात गात – SAREL RAAT GAAT GAAT
भिजेल चिंब चांदण्यात सरेल रात गात गात नवीन सूर्य उगवताच सरेल रात गात गात जुने नवे स्मरून प्रेम बुडेल हृदय पूर्ण त्यात खिरेल नीर लोचनात सरेल रात गात गात हसेल पूर्व अंबरात झरेल नाद मंदिरात झुलेल वात पाळण्यात सरेल रात गात गात खगास जाग येत येत घुमेल शीळ वाटिकेत सुगंध भोर सावल्यात सरेल रात गात…
-
आत्म परीक्षण करण्यासाठी – AATM PARIKSHAN KARANYAASAATHEE
आत्म परीक्षण करण्यासाठी दिवस आजचा पुरेलका आत्म परीक्षण करण्यासाठी नयनी पाणी भरेलका जगण्यासाठी हवेच मीपण मरण्यासाठी कर तू तू आत्म परीक्षण करण्यासाठी इतुके मीपण पुरेलका तर्क लावुनी मिळेल उत्तर असेल जर तो प्रश्न खरा आत्म परीक्षण करण्यासाठी प्रश्न उत्तरी झरेलका जिंकशील जर करुन परीक्षा दुसऱ्यांमधल्या न्यूनांची आत्मपरीक्षण करण्यासाठी आज अहंपण हरेलका अर्थ जाणण्या आत्मबलाचा नाम…
-
तूच शोध आज चूक – TOOCH SHODH AAJ CHOOK
तूच शोध आज चूक तापवून आज भूक सांग फरक बघ म्हणून पोपटास आज शूक लूक काज शिवण टिपण लाव बटन आज हूक कर्म निर्जरा करून गाठलेस आज टूक गुच्छ हा बुके म्हणेल पुस्तकास आज बूक वृत्त – गाल, गाल, गाल, गाल.
-
धनादेश – DHANAADESH
धनादेश मी दशकोटीचा कटले नाही उठवुन ठेंगा अंधपणाने वटले नाही काचपात्र मी शुद्ध जलाचे सुबक ठेंगणे पितळी कळशीच्या धक्क्याने फुटले नाही मात्रावृत्त (८+८+८=२४मात्रा)
-
हायहिल्स – HAAYHILS(HIGH HEELS)
हायहिल्स ती घालुन तेव्हां चालायाची टेचातं कधी न गजरा आणि फुलांना माळायाची केसातं ऐकत राही प्रश्न जरी ती उत्तर देई मौनातं नयन झुकवुनी भल्याभल्यांना पाडायाची पेचातं गर्द दुपट्टा सावरीत कधि पायघोळ ती मॅक्सीतं नित्य लपेटुन मोहक साडी भिजे श्रावणी मेघातं रंग सावळा खुलवण्यास ती क्रीम लावुनी गालांसं गुलबक्षीसम अधर मुडपिता वीज सळसळे देहातं भाग न…