-
सम्यक मोळी – SAMYAK MOLEE
तीनच ओळी सतरा अक्षरांची सम्यक मोळी बांधूया झोळी लाटुया जाळीदार पुरणपोळी मूर्ती प्रक्षाळू दशलक्षण धर्म गुणांचा पाळू
-
टपोऱ्या गारा – TAPORYAA GAARAA
सहज सोपे आवडले हाइकु नकोच जोखू गोडवा राखू एवढ्या तेवढ्याने नको भडकू नको तडकू गुलाबजल शिम्पू भेगांना झाकू लाव तंबोरा जुन्या आठवणींच्या जुळव तारा समुद्र खारा आपल्यासाठीच हा मोसमी वारा चढता पारा वळिवाचा पाऊस टपोऱ्या गारा वादळ झेल हरतेस कशाला त्याच्याशी खेळ प्रेमच प्रेम भिंतीवर बसली फोटोची फ्रेम रसाळ गोड घोलवडचे चिक्कू कशाला विकू खास…
-
हाइकु – HAIKU
ऐक हाइकु लिहीन म्हणते मी सात हाइकु रचे हाइकु सुगरण बायकू गुणाची काकू जरी वाटते अवघड हाइकु घाबरू नकु लिहू हाइकु कवितेच्या अंगणी आपण टिकू एवढे करू लिहिताना हाइकु सत्यच बकू हाइकुसाठी वेळात वेळ काढू थोडेसे चुकू प्रयत्न करू हाइकुत हाइकु छान हुडकू
-
पान का काळे करू – PAAN KAA KAALE KAROO
सांग मी मम पुस्तकाचे पान का काळे करू काजळीने लोचनातिल भाव का काळे करू शान माझ्या चेहऱ्याची रुंद मोठे उंच जे फक्त मजला शोभते ते नाक का काळे करू धन्य झाले तृप्त झाले संत वचने ऐकुनी झळकती ऐन्यापरी ते कान का काळे करू मी न कुठले कार्य करते मी स्वतःला तोलते तोलताना बोलताना ओठ का…
-
सारथी – SAARATHEE
वादळे रोंरावताना मेघ गगनी ठाकती शेर ओढी रथ ढगांचा ‘मी’ तयांचा सारथी खेचुनी मम भाव सारे शून्य मी भासे कधी छळत राही पण अनामिक सांजवेळी ओढ ती पौर्णिमेचा चंद्र उगवे अंतरी माझ्या कधी द्यावया आतूर हाका घन समुद्री गाज ती वादळे बनतात जेंव्हा भावनांची गलबते मीच प्रज्ञा मीच प्रतिभा मी सुमेधा अन रथी बीज असुदे…
-
तरूतळी – TAROOTALEE
या स्थळी तरूतळी स्वच्छ सुंदर झोपडी धरी शिरी सावली गर्द झुंबर झोपडी झुलतसे बाळ गुणी पांघरोनी गोधडी अंगणी सई विणे अंगडी अन टोपडी लिहित बसे गोप कोणी उघडुनी चोपडी दूर तिथे बोलण्यात दंगलेली चौकडी नगरजन नित्य येती वाट करुनि वाकडी
-
खरे काय आहे – KHARE KAAY AAHE
खरे काय आहे बरे काय आहे कळावे तुलारे तुझे काय आहे तुला पाहिले मी तुला ऐकले मी तरी जाणलेना भले काय आहे गुपीते मनाची जुनी रेखताना जरा अनुभवावे नवे काय आहे इथे पूर्ण नाही कुणाचेच काही तरी आस शोधे पुरे काय आहे किती मोह तुजला उणे शोधण्याचा अता अधिक शोधू खुले काय आहे नसे तू…