-
समाधी – SAMADHI
सर्व लक्ष्म्या पावल्यावर पावते मन मोक्ष्मलक्ष्मी जीवनाचे रंग सारे दावते मन मोक्ष्मलक्ष्मी लाभण्या संसार शांती लेकरांना हिमनदीने घेतली जेथे समाधी बाव ते मन मोक्षलक्ष्मी सांजसमयी गोधुलीला जीव ध्यानी लाल गोळा अंतरीच्या दीपज्योती लावते मन मोक्षलक्ष्मी चेहऱ्यावर सरलतेचे भाव तपुनी वर्तमानी लेक नाती सून सासू राव ते मन मोक्षलक्ष्मी मिळविण्या मध पेटवीता भडकुनी मोहोळ उठते भृंग…
-
बँड – BAND
चतुर्दशीला मनी नारकी युद्ध पेटले माजाचे तीव्र कामना अंगांगातुन रंग पेटले माजाचे मायाचारी कुटील नीती वक्रपणाने उचंबळे एक तडाखा बसता फुटुनी बीळ पेटले माजाचे सैरावैरा सर्प धावती शोधायाला नवी बिळे धपापणारे मूळ वाळके खोड पेटले माजाचे कुठे न थारा मिळता जुळता कात टाकुनी सळसळते लाळ साठवुन पिंक टाकता यंत्र पेटले माजाचे रसशाळा जणु इथे उघडली…
-
जोगवा – JOGAVA
गुमान ना मिजास तव बसून मौन सोसली खरेपणास धार मम कटी कसून लावली सुके हिशेब बेगडी मला कधी न भावले खुळे हुमान गोठले नवीन वाट पावली प्रसव कळा सुन्या मुक्या उठेल गाज अंतरी झुकून बघ दिसेल मूळ शांत गार सावली पुरे अता उधार मागणे फिरून जोगवा फुले फुलून वाटिका भरून पूर्ण सांडली कनक कळ्या दवारल्या…
-
अतिशय – ATISHAY
जीवांस एक आशा कंदील पेटलेले चढता उषेस लाली गाणे जयास झेले फांदीवरील खोपा सुगरण विणे गतीने शिंपी सुतार पक्षी कार्यात गुंतलेले पाऊस परसदारी झोडून बाग जाता सदरे फुलाफुलांचे पानात बेतलेले गात्रात सौरमाला ग्रह चंद्र सूर्य तारे छात्रालयात जमले वस्ताद शिष्य चेले गुलकंद वा बनारस पाने विड्यात भारी करतात सेठ सौदे लावून पान ठेले मज आवडे…
-
रुपये – RUPAYE
संकेत बारकावे पाळून शोध घ्यावा इच्छांस त्रासदायक भागून शोध घ्यावा तृप्ती उडून जाता पाडून छिद्र वस्त्रा हुरहूर करुन मोठी फाडून शोध घ्यावा झालाय प्राण गोळा पाऊल उचलताना लय ताल सूर ठेका गुंफून शोध घ्यावा झाले फिके फिके जर नवरंग लोचनांचे दृष्टीतले निखारे फुंकून शोध घ्यावा मम नाव अर्थ रुपये अब्जावधी “सुनेत्रा” खात्यात सहज टिकण्या कोळून…
-
गाज भरती – GAAJ BHARTI
मुक्तक .. खटका गाज ऐके बघे अंध बहिरी नव्हे वात उडवेल तिज लाट गहिरी नव्हे ओळखावा झणी ताल गझलेतला बाज खटका खडा गीत अहिरी नव्हे गझल ..तृषा चूल पेटे अशी गाव शहरी नव्हे जल हवा नाचरी लेक लहरी नव्हे काटकसरी बरा डाव आहे नवा पीठ घोळून घे तूप जहरी नव्हे व्यर्थ भीती नको गाज भरती…
-
राज्ञी – RADNYI
अंतरी चैतन्य आहे लक्षपूर्वक ध्यान कर प्रगटण्या सत्यास मनुजा तू कट्यारी म्यान कर ही धरा दासी न अपुली ही खरी राज्ञी इथे जाण आत्मा आचरण स्मर फक्त गप्पा त्या न कर जे पटे तुज ते करावे कर्मफळ देणार ते व्हावयाला आत्मनिर्भर धाडसी हो भ्या न कर अंधश्रद्धा काय असते जाण आधी सांगण्या प्रवचने अन कीर्तने…