-
भोला – BHOLAA
तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी बिनधास्त बालाजी मुंडे यांची कुठे मनाला खोलायाची सोयच नाही आता म्हणेन कोणा भोला याची सोयच नाही आता इतुके त्यांनी जीव कोलले मनोरंजनासाठी विटीस सुद्धा कोलायाची सोयच नाही आता नंदीबैलासमान त्यांनी डोलविल्यावर माना सुरांवरीही डोलायाची सोयच नाही आता मीच कातडे सोलत जाता माझ्या कायेवरले पक्व केळही सोलायाची सोयच नाही आता…
-
कृष्ण चादर – KRUSHN CHAADAR
पाहणेही भोगणे अन ऐकणेही भोगणे भोगणे हे पाप तर मग वाचणेही भोगणे पापपुण्याच्या हिशेबी शून्य बाकी जेधवा जीवनी रंगून जाणे डुंबणेही भोगणे प्राशुनी वैशाख वणवा ढाळता वाफा धरा तापल्या भूमीवरी त्या चालणेही भोगणे प्यावया तव लाल रक्ता डास पिसवा चावती डंख त्यांचा स्पर्श त्यांचा सोसणेही भोगणे मच्छरांची कृष्ण चादर पांघरूनी बैसता रात्र काळी गाळते ते…
-
फळकुटे – FALHAKUTE
शहरगावी सून आली राहण्या एक खोली मून झाली राहण्या घासलेटी स्टोव्ह होता रांधण्या सोबतीला जून पाली राहण्या घासुनी फरशीस देण्या चारुता गुणगुणे ती धून चाली राहण्या ओसरी नव्हतीच नव्हते स्नानघर फळकुटे जोडून न्हाली राहण्या शेत नाही तिज स्वतःचे राबण्या राबतेय विणून शाली राहण्या पाठ छहढालास करुनी आज तू आणल्या जिंकून ढाली राहण्या लागला लग्गा कुणा सट्ट्यावरी…
-
चिंधी संधी – CHINDHEE SANDHEE
चिंधी संधी….. (दोन मुक्तके) मला हवी तर मिळेल मजला संधी बिंधी कशास बांधू जखमेवरती चिंधी बिंधी रक्त सांडुदे म्हणून करते कानाडोळा तुला वाटते तशी न मी रे अंधी बिंधी … इच्छा आहे जगावयाची म्हणून मी या जगती आहे मरेन केव्हातरी पुढे मी तुजसाठी पण संधी आहे मरावयाची असली चिंधी संधी मजला नकोच आहे इच्छेविन मज मारायाची…
-
ठाणे – THAANE
पुण्यनगरी प्रिय जिवांची मिथ्य शक्तीचे न ठाणे आवडे आत्म्यात मजला बिंब माझे मी पहाणे उमलती काव्यात माझ्या अंतरीची भावपुष्पे तोंडच्या वाफेवरी ना धावते मम मुक्त गाणे बोलते बेधडक तरीही दुखविले ना व्यर्थ कोणा बोलण्याचे टाळण्याचे धुंडते ना मी बहाणे बाष्प पापातिल जलाचे दाटते मेघात जेव्हा लोळुनी झिंगून पिंगुन बरळतो वारा तराणे टिपुन घेती चिवचिवाटा नेत्र…
-
तीर्थंकरा – TEERTHANKARAA
पंचकल्याणिक कुणाचे बोल रे तीर्थंकरा इंद्रियांचे की जिवाचे सांग रे तीर्थंकरा गणधरांनी संप केला बैसले ध्यानात ते समवशरणच ओस पडले ऊठ रे तीर्थंकरा शस्त्रधारी भक्त येता मौन शासनदेवता मौन त्यांचे सुटत नाही वाच रे तीर्थंकरा ठासलेल्या लेखण्या या मायभूच्या रक्षणा तूच आता चाप त्यांचा ओढ रे तीर्थंकरा पंचभूते भडकलेली उदक नाही औषधा अर्घ्य तुज देण्यास…
-
भट्टी – BHATTEE
समय आहे शांत आहे मुग्ध अंतर गात आहे वारियातील मोगऱ्याच्या परिमलाने न्हात आहे कुंदनाचे पात्र ग्रीष्मा वितळता भट्टीत तुझिया मृत्तिकेचा गंध त्यातिल माझिया देहात आहे मी कशी परजेन शस्त्रे मारण्या जीवास कुठल्या जीव जगण्या लेखणीची परजते मी पात आहे लाट येता पाणियातिल बिंब हलते फक्त माझे तू नको पण डळमळू रे मी कुठे पाण्यात आहे…