-
तीर्थंकर चरण – TEERTHANKAR CHARAN
आदिनाथ तीर्थंकर पहिला चरण तळी ऋषभ अजितनाथ तीर्थंकर दुसरा चरण तळी गजराज संभवजी तीर्थंकर तिसरा चरण तळी अश्व अभिनंदन तीर्थंकर चौथा वानर चरण तळी सुमति जिन तीर्थंकर पंचम चकवा चरण तळी पद्मप्रभू तीर्थंकर षष्ठम लोटस चरण तळी सुपार्श्व जिन तीर्थंकर सप्तम स्वस्तिक चरण तळी चंद्रप्रभू तीर्थंकर अष्टम चंद्रकोर चरणी पुष्पदंत तीर्थंकर नववा चरण तळी मगर…
-
अक्षर मोती – AKSHAR MOTEE
नकोच काही देणेघेणे लिहावी छान मी गझल फुलपाखरासम उडायाला विणावी छान मी गझल उडून उडून दमल्यावरती चित्रात रेखण्या तिला चिमटीत सान पकडुन पंख धरावी छान मी गझल अंगणातल्या दोरीवरती वाऱ्यात सुकवायाला बुडवून वाहत्या निर्झरात पिळावी छान मी गझल भूचक्रासम गरगर फिरण्या तेलात सोडून उष्ण तांबूस लाल खुलाया रंग तळावी छान मी गझल झुळझुळ पहाट वाऱ्यासंगे…
-
हुंबाड वारा – HUMBAAD VAARAA
नकोच काही देणेघेणे लिहावी छान मी गझल…. भेटावे वाटेल मनास तेव्हा धाडावी छानशी गझल…. कशास मोजाव्या मात्रा नि बित्रा अक्षरगण साचे वृत्तांची जत्रा … फुलांच्या संगे खेळेन रंग वाऱ्याची समाधी करेन भंग… रंगास उधळत फुलांच्या वेड्या काढूया वाऱ्या पक्ष्यांच्या खोड्या… वाटेवर धोंडा मारता शिंग त्याच्यावर धो धो ओतेन रंग … वाटेच्या धोंड्यास सांगेन गोष्टी गोष्टीत…
-
मंदारचल – MANDAAR CHAL
देवी वाचमुपासते हि वहव: सारं तु सारस्वतं। जानीते नित रामसौ गुरुकुल क्लिष्टो मुरारि: कवि।। अब्धिर्लंघित एव वानर भटै:किंत्वस्य गंभीरतां। आपाताल-निमग्न-पीवरतनुर्जानाति मंदराचल: ।। ~ आचार्य हेमचंद्रसुरि अर्थ – थातूरमातूर पुस्तकी विद्येने आतापर्यंत अनेकांनी वाग्देवीची उपासना केली आहे परंतु सारस्वतसार फक्त गुरुकुल-वासात निवास करून कंटाळलेला मुरारी कवीच जाणतो. वानरसेनेने समुद्र तर ओलांडला परंतु तिला समुद्राची खोली जाणता…
-
केव्हातरी मिटाया – KEVHAATAREE MITAAYAA
केव्हातरी मिटाया मज लागणार डोळे ढाळू नकोस अश्रू मम तेवणार डोळे शब्दांस गोल झाल्या लावून धार डोळे बनुनी कलम दुधारी करणार वार डोळे पत्रे उडून जातिल कर अंगणात गोळा पत्रांवरी पहाटे दव ओतणार डोळे माती तरूतळीची बकुळीस गोष्ट सांगे माझे तुझे मिळूनी होतील चार डोळे नेत्रांस दान करुनी दृष्टी दिली कुणाला ठाऊक ना जरी हे…
-
सीमोल्लंघन SEEMOLLANGHAN
सीमेचे उल्लंघन केल्यानंतर बोलू पुन्हा वेगळे आल्यावर प्रत्यंतर बोलू भटकुन भटकुन मन थकल्यावर ध्यानाग्नीतुन हरेक ओठांवर हलतो तो मंतर बोलू आंतरजाली फिरती शोधक नित्य इंजिने गूगलवरच्या इंजिनांस त्या व्यंतर बोलू देव पाहण्या नकाच काटू अंतर बिंतर नीतळ आत्म्यालाच स्वतःच्या अंतर बोलू विचार मंथन करण्याचा अन बोलायाचा मला सुनेत्रा आहे ध्यास निरंतर बोलू