-
नागिण जणु तू – NAGIN jANU TOO
नागिण जणु तू तव चालीची सळसळ झालो तुझ्या दुपट्ट्यातिल ढाक्याची मलमल झालो तुझे दुधारी वर झेलण्या कातळ झालो सुगंध प्राशुन त्या वारांतिल परिमळ झालो मिटल्या पापणकाठी तव मी अश्रू होतो नेत्र उघडता तू तव गाली ओघळ झालो तुझी सुई अन तुझाच धागा तुझेच टाके रंगबिरंगी अनेक पदरी वाकळ झालो निर्झरबाला बनून येता तू मम हृदयी…
-
जगण्याची मजा – JAGANYAACHEE MAJAA
चला सारे लुटू आता जगण्याची मजा धो धो धो धो खळाळून हसण्याची मजा गप्पांमध्ये दंग होत गोष्टी रचूया गाऊ नाचू गोल फिरू ठेका धरूया हळूहळू धावू घेऊ फिरण्याची मजा सागराच्या काठावर वाळूतच लोळू चिमणीचा खोपा बांधू ऊन खात पोळू जपून जपून घेऊ धडपडण्याची मजा कपट लोभ क्रोध अहं शत्रू खरे मारू शुद्ध स्वच्छ मने करू…
-
भविष्य माझे – BHAVISHYA MAAZE
भविष्य माझे मीच सांगुनी मी घडवावे भविष्य माझे मला न भीती कशाकशाची मीच लिहावे भविष्य माझे भूतकाळ मम् सुंदर होता वर्तमानही सुंदर सुंदर भविष्य सुद्धा अतीव सुंदर ऐसे गावे भविष्य माझे मुक्तक – मात्रावृत्त (८/८/८/८/) ३२ मात्रा
-
बाउन्सर – BAAUNCAR (BOUNCER)
बाउन्सर माझ्या गझलांमधले शेर तुझ्यासाठी बाउन्सर नकली तुझे फॉर्म्युले केर तुझ्यासाठी बाउन्सर कसले टाकतोस तू सोड खुळ्या नादा बाउन्सर माझे अडकविण्या तुज हेर तुझ्यासाठी बाउन्सर फसवे टाकुन घेशी लाख लाख सुट्ट्या बाउन्सर साठुन भवती झाले ढेर तुझ्यासाठी बाउन्सर कळण्या डोक्यामध्ये हवा नसावी रे बाउन्सर माझ्या भाषेमधले फेर तुझ्यासाठी बाउन्सर आता तुझाच तुजला गरगर बघ फिरवे…
-
दाब थेरपी – DAAB THERAPEE
वाक वाकुनी पाठ वाकली जोक वाचुनी पाठ वाकली सज्ज जाहले तीर कामठे त्यांस ताणुनी पाठ वाकली काम धाम सोडून बैसता पाठ राखुनी पाठ वाकली माल टाकती ट्रेंड वाहने त्यांस हाकुनी पाठ वाकली भाज्य भाजका नाच नाचवुन नाच नाचुनी पाठ वाकली दाब थेरपी भार नियमने वेळ पाळुनी पाठ वाकली फोर मारले सिक्स मारले ठोक ठोकुनी पाठ…
-
दामिनी – DAAMINEE
पूर्ण चंद्र रात शीत गात गात चालली नाव वल्हवीत गीत गात गात चालली चंचला हवा परी झुळूक मुग्ध लाजरी अंतरी भरून प्रीत गात गात चालली संगमी मुळामुठेत नाचण्यास नर्तिका वीज आग पाखडीत गात गात चालली डोंगरी धबाबत्या जलात मस्त दामिनी कातळा करून चीत गात गात चालली चांदणे दुधासमान सांडता धरेवरी ओंजळी निशा भरीत गात गात…
-
दीपोत्सव – DEEPOTSAV
दुर्लक्षित ना ना व्यापारी, घाणेरी निवडुंग रुई खुलते झुलते घरात दारी काटेरी निवडुंग रुई जिथे बालके रोगी दुबळी रोजच मरती तिथे तिथे लसी टोचण्या करिती वारी बाणेरी निवडुंग रुई तल्लख करुनी घ्राणेंद्रियांस घाणेरीच्या फुलांसवे झुरळे माश्या मच्छर मारी सोनेरी निवडुंग रुई झेंडू शेवंतीच्या संगे वाड्यामधुनी सासरच्या येतीजाती फुलबाजारी माहेरी निवडुंग रुई दीपोत्सव भूवरती येता दिवे…