Tag: Ghazal in akshargan vrutta

  • मैफल – MAIFAL

    हे पोलके झाले जुने टाकून देना साजणे आणेन चोळी जांभळी कशिदा तुझा तू रेखणे ये राहण्या माझ्या घरी हिंडू फिरू पाहू पुणे भरवूत मैफल गझलची येतील दर्दी पाहुणे आता सुनेत्रा बासना गझलेस पाणी पाजणे वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/

  • भार्या – BHAARYAA

    संपेल आता जाळणे अन प्रीत सुंदर टाळणे ढग डोंगरी पाणी झरे आणू कशाला गाळणे रंगून सुकले रंगही आता पुरे हे वाळणे येता समीप मधुघटिका शंकेस का या पाळणे आनंद मोदे विहरतो डोळे नको मग गाळणे भार्या खरी तव सुंदरी परकीवरी का भाळणे वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा गा…

  • सोनिया – SONIYAA

    वचनास मम जागावया गाते शिरा तानोनिया कोठून त्याही उगवल्या फुकटातले लाटावया माझीच ही आहे धरा दासी न ही तुडवावया घाटात कोणी टाकला तो कांब मज पाडावया चल संगती माझ्या अता तो हात हाती घ्यावया डोक्यावरी ना बैसले बसले इथे रक्षावया मैत्रीतला माझ्या दुवा आहे सुनेत्रा सोनिया वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा…

  • शिंपला – SHIMPALAA

    चल खावया पाणीपुरी भरल्यात साऱ्या घागरी मम शारदा विद्या सई रेखाटते मज हासरी निल सुषम शैला पद्मजा हाती तिच्या फुल टोकरी उन्मेष झाला मेष अन नव कल्पना झाली परी मनमोहिनी मंदाकिनी घुमवीत आहे बासुरी हा कांचनी मृदु शिंपला भिजला दवाने अंतरी आली फळे वाटावया सुंदर सुनेत्रा नाचरी वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा…

  • व्यवहार – VYAVAHAAR

    कोणास ना बोले कुणी पण बोलते हृदयातुनी व्यवहार जो जाणे खरा तो निश्चयी आहे गुणी मी काफियाने बांधली कविताच ती होती जुनी जेव्हा तिला तू डिवचले ती बोलली फुत्कारुनी हे वृत्त आहे बेरकी अन गझल माझी देखणी वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/

  • सल्लेखना – SALLEKHANAA

    चल घे अता सल्लेखना अन आत्महत्या टाळना फासे उगा फेकू नको असते जुगारी वासना आता पुरे हे पूजने त्यांच्यात काही राम ना खोट्याच त्यांच्या घोषणा माझी खरी ही साधना काहूर उठता अंतरी मौनात केला सामना जमलेच ना मज टाळणे शिव सत्य सुंदर भावना वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा…

  • रांगडी – RAANGADEE

    आलेच ते बघ गावया खोटे मढे उचलावया भित्री कधी नव्हतेच मी त्या नाटक्यांना भ्यावया मतदान मी केले खरे सरकार माझे यावया का घाबरे ती मासळी पाण्यात या उतरावया हे चाहते आले नवे गझलेत माझ्या न्हावया आहे सुनेत्रा रांगडी दगडांस त्या फोडावया त्यांनीच केले लंगडे फुकटात कुबड्या द्यावया वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा…