-
संत – SAINT
-
चौकट – CHOUKAT (frame)
तरही गझल गझलेची पहिली ओळ गझलकार इलाही जमादार यांची. तसा कुणाच्या चौकटीत तो बसला नाही तरी कुणाला अंगणातही दिसला नाही फुलाफुलांची अंगणातली रांगोळी ही तिला जपाया पावसातही फसला नाही हवेहवेसे रंग फासुनी भिजवुन मजला कधीच माझ्या चौकटीत तो घुसला नाही जरी नव्याने चौकटीतल्या विश्वी रमले तरी कधीही मूक होऊनी रुसला नाही कसे हसावे हेच शिकविले…
-
हवाई – (aerial)
-
गाणे – GAANE (song)
सांज व्हावी मोरपंखी रात यावी गात गाणे रामप्रहरी वारियाने जाग यावी गात गाणे वेदनांचा अंत व्हावा प्रेम या जगती फुलावे मूक झालेल्या विजेची साद यावी गात गाणे चंद्र तारे सूर्यसुद्धा डोकवावा अंतरी मम मी असावे स्वच्छ ऐना प्रीत यावी गात गाणे मी जशी आहे तशी मी वागते अन बोलतेही सांगण्या हे वादळाची हाक यावी गात…
-
आनंद – AANAND (happiness)
आनंद अज्ञानातही असतो कधी माणूस तेव्हा त्यातही रमतो कधी नाही जरी त्याला जमे झरणे पुन्हा फुलवावया वृद्धांस तो झरतो कधी शोधावया कोणा जरी फिरतो सदा माझे तरी नाही कुणी म्हणतो सदा कोणावरी केली न प्रीती सांगतो मौनातल्या बिंबात का बुडतो कधी जिंकावया निघतो जगा शस्त्रांसवे गोष्टीतल्या युद्धातही हरतो कधी खेळात आता खेळ नाही वाटता लांबून…
-
बारी – BAAREE (turn)
बाहेर तू उन्हाने होशील तप्त भारी डोक्यातल्या भुश्याची पेटेल आग सारी या शायरीत माझ्या आहेच जल सुगंधी ते शिंपडून पाणी विझवेल आग झारी क्षितिजावरून वाहे झुळझूळ शीत वारा त्याच्यासवे ढगांची आता निघेल वारी नाही कसे म्हणावे वळीवास त्या धरेने होती अधीर तीही चाखावया खुमारी घेऊन मौन ओठी तू ऐक गझल माझी आता हसावयाची अमुची असेल…
-
विसर सारे – VISAR SAARE (forget it)
काळजाला थोपटावे अंथरावे वाटले तर …विसर सारे …. वापरोनी ते धुवावे वाळवावे वाटले तर …विसर सारे…. काष्ठ पत्ती वाळवीली चूल दगडी पेटवीली …भर दुपारी…. त्या चुलीवर काळजाला पेटवावे वाटले तर …विसर सारे …. सांगते ती सावजाला मी जपावे काळजाला …अंथरोनी…. मीच चालुन त्यावरी ते चुरगळावे वाटले तर …विसर सारे …. हाक ती मारीत आहे चालली…