Tag: Ghazal in akshargan vrutta

  • रुमाल – RUMAAL

    लिहीन काही नवे नवे मी सुचेल जे जे मला हवे मी कलम असे गुज करे वहीशी पुन्हा पुन्हा तेच आळवे मी थकेल जेव्हा रुमाल माझा टिपून घेईन आसवे मी जरीन दांडू करात माझ्या चुकार विट्टीस टोलवे मी उडवित बसते निळ्या मनाचे प्रभात होता नभी थवे मी निळ्या समुद्रास गाज सांगे रड्या तरंगास हासवे मी निघेन…

  • नवी भरारी! NAVEE BHARAAREE!

    नशीब म्हणजे नवी भरारी! स्वतःच घ्याया हवी भरारी!! प्रभात होता!! कुणी निशाचर! म्हणेल घेना रवी भरारी!! सुजाण या! मैफलीत माझ्या… असेल ही भैरवी भरारी!!!! पिसे गझलचे! नभी तरंगे!! तनू तिची!आळवी भरारी! हृदय असे हे!! बुलंद माझे!!! विधीलिखित- वाकवी भरारी!!! वृत्त – जलौघवेगा, मात्रा १६ लगावली – ल गा ल गा गा/ ल गा ल गा…

  • व्योमगंगा – VYOMA GANGAA

    त्या तिथे कोणीच नव्हते पण तरी ती भीत होती आतला आवाज म्हणतो हीच मोठी जीत होती मृदु निरागस भाव नयनी उंबराचे फूल जणु ती पण तिला ठाऊक नव्हते ती स्वतः संगीत होती अंतरीचा नाद दिडदा ऐकता हरवून गेली हरवली पण गवसलेले शब्दधन सांडीत  होती मेघमाला भासली ती वाटिका फुलवून गेली मेघमाला सावळी पण वाटिका रंगीत…

  • नक्षत्र बाला – NAKSHATRA BAALAA

    तृप्त झाली ही धरा बघ चांदण्यांच्या पावसाने रातराणीच्या फुलांनी भरून गेली सौरभाने अंबरातिल मेघनेसह तारकांनी नृत्य केले दाविल्या त्यांच्या अदा अन बिंब सुंदर आरशाने मंदिरातील दीपज्योती धूप दरवळ कर्पुराचा अंगणी मृदगंध लहरे शिंपलेल्या पावसाने शुभ्र कलिका मोगऱ्याच्या वेल जाई उंच गगनी आसमंती सूर झरती पंडितांच्या गायनाने देखण्या नक्षत्र बाला  मुग्धही आकाशगंगा मी सुनेत्रा शब्द वेचे…

  • शह -SHAH

    वृत्त अपुले मंजुघोषा आज आहे वीस आणिक एक मात्रा साज आहे मी लिहावे तू लिहावे मस्त काही जाण मित्रा खास माझा बाज आहे बासरीचा सूर कृष्णा हा नसावा राधिकेच्या अंतरीची गाज आहे पाहिले स्वप्नात रात्री स्वप्न वेडे उंच माझ्या मस्तकी सरताज आहे कुंतलातिल शुभ्र गजरा मोगऱ्याचा मैफिलीच्या पापण्यांतिल लाज आहे राम नाही श्याम नाही धुंद…

  • ठिबक सिंचन – THIBAK SINCHAN

    काय बोलू काय पाहू मज कळेना अंतरीचे चाललेले गुज कळेना किलबिलाटातच पहाटे ऐकलेली पाखरांची मधुर ती कुजबुज कळेना कैक पूजा मांडल्या कल्याणिकांच्या का तुला पण शब्द सुंदर भज कळेना प्रवचने शास्त्रे पुराणे पाठ तुजला प्रेममय भाषा गझलची तुज कळेना घाम तो गाळून फुलवी द्राक्षबागा फक्त त्याला ठिबकसिंचन निज कळेना वृत्त – मंजुघोषा , मात्रा २१…

  • हिमगौर – HIM GOUR

    वर्षताना दुग्धधारा चांदण्यांच्या चुंबितो ठिणग्यांस वारा चांदण्यांच्या गोल या पात्रात हसता बिंब माझे हलवितो गर्दीस तारा चांदण्यांच्या वेलदोडे केशराच्या चार ओळी मिसळतो क्षीरात झारा चांदण्यांच्या बैसुनी कोजागिरीला शिखरजीवर वेचिते हिमगौर गारा चांदण्यांच्या ओतता दाणे अनामिक ओंजळीने घळघळे ताटात पारा चांदण्यांच्या वाजता पावा हरीचा गोप येती कापण्या रानात चारा चांदण्यांच्या तुंबड्या भरतील ऐदी आजसुद्धा बसवुनी शेतास…