Tag: Ghazal in akshargan vrutta

  • संपदा घेऊन ये – SAMPADAA GHEOON YE (“come with prosperity”)

    रंगल्या पूर्वेसवे तू रंग ते लेऊन ये कोवळ्या किरणांसवे तू संपदा घेऊन ये गातसे आकाश गझला पंख तू पसरून ये कुंकवाला शुभ्र भाळी आज तू रेखून ये कैद करण्या शृंखला या ठेवल्या नाहीत मी थांबली गाडी जरी ना साखळी खेचून ये येच उल्के भूवरी या बहरण्या फुलण्या गडे वाटली ‘भीती’ जरी ‘तिज’ अंबरी फेकून ये…

  • होतसे मी क्रुद्ध आता – HOTASE MEE KRUDDH AATAA

    होतसे मी क्रुद्ध आता जाहले बघ वृद्ध आता शब्द पुद्गल जाणते मी पेटवीती युद्ध आता शब्द आतुर बोलण्या पण कंठ का अवरुद्ध आता रंगले मन रंग उधळुन कोण येथे शुद्ध आता नांदता चित्तात शांती भासते मी बुद्ध आता वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा.

  • गाडी – GAADEE (vehicle)

    मी पाहते मला अन सुटते सुसाट गाडी मी वाचते तुला अन बनते विराट गाडी डब्ब्यात बैसलेले सारेच शब्द वेडे शेरात कोंबता मी होते पिसाट गाडी घेताच वेग चाके गगनात धूर ओके ओझे कितीजणांचे ओढे मुकाट गाडी मस्तीत शीळ घाले वळवून देह डोले जो नियम पाळतो त्या देतेच वाट गाडी जोडून लाकडांना बनली नवीन बग्गी दौडे…

  • मृगजळ – MRUGAJAL (mirage)

    हाय! मी वेडी किती रे रंगले  त्या मृगजळी चुंबिले प्रतिमेस भ्रामक दंगले त्या मृगजळी शिल्प कोणा प्रेमिकांचे घडवितो शिल्पी कुणी बनविता कैदी तयाला भंगले त्या मृगजळी बेरकी होत्याच वृत्ती वृत्त होते नेटके अर्थ पण फसवे परंतू संपले त्या मृगजळी यक्षही नावेत होते जादुई खुर्च्या तिथे चिकटले खुर्च्यांस जे जे गंडले त्या मृगजळी गझल सच्ची घेउनी…

  • उरेन मी – UREN MEE (I will remain)

    जे मला पटेल तेच करेन मी जाळुनी पूरून हाव उरेन मी तूच बेजबाबदार नको म्हणू सांडली तशीच प्रीत भरेन मी पोहताच कालव्यात रुबाब का? सागरात भोवऱ्यात तरेन मी तू तुझा अहं गडे कुरवाळिशी जिंकताच ‘मी’पणास हरेन मी कागदी फुले जरी चुरगाळिली आजही बनून दुःख झरेन मी आठवांस त्या सुरेल अजूनही कोंडुनी रचून गीत स्मरेन मी…

  • माझे अडखळणे – MAZE ADAKHALANE (my stumbling)

    जितुके दाहक तितुके मोहक माझे अडखळणे म्हणती साधक नसते बाधक माझे अडखळणे हळव्या कातर समयी भावुक प्रेमीजन म्हणती हटके राजस करते पातक माझे अडखळणे जल काचेतिल प्रतिबिंबासम काया झुळझुळता झुलते झुंबर हलता लोलक माझे अडखळणे वचने पेलुन शपथा झेलुन सांधे कुरकुरता बनते नाजुक असली नाटक माझे अडखळणे करण्या सावध मजला पाडुन पाणी खळबळता भलते साजुक…

  • शमा – SHAMA (beacon)

    ही शमा ना जाळते तुज तू स्वतः जळतोस रे रंगलेल्या मैफिलीतुन का असा गळतोस रे… जाळते शम्मा तनूला जाळण्या कर्मे जुनी गोठता ते मेण पुद्गल का तया मळतोस रे अंतरी तेवेल समई उजळण्या गर्भास या नाद ऐकुन झांगटांचा का इथे वळतोस रे उलगडाया गूढ कोडे यत्न मी केले जरी राहशी हृदयात माझ्या ना मला कळतोस…