Tag: Ghazal in akshargan vrutta

  • कोडे – KODE (puzzle)

    पाय का हे पोळताती घातले जोडे तरी का न तृष्णा ही मिटे  रे नीर ही गोडे तरी धावती हे लोक म्हणुनी धावशी वेड्यापरी ऐकण्या गुज अंतरीचे थांबना थोडे तरी बैसले घोड्यावरी मी सैर करण्या डोंगरी का अडे मन पायथ्याशी दौडते घोडे तरी मूढ मी होते खरी अन गूढ त्या होत्या जरी प्रेमगोष्टी भावल्या मज वाटल्या…

  • आज मी नाहीच तेथे – AAJ MEE NAAHEECH TETHE ((“today,I am not there at all”)

    श्वास त्यांचा मोकळा झाला परंतू… आज मी नाहीच तेथे जाणत्यांची वाहते भाषा परंतू … आज मी नाहीच तेथे फोडण्या नेत्रांस माझ्या लेखणीने… आंधळे सारे निघाले पोचले ते माझिया गावा परंतू … आज मी नाहीच तेथे वादळी मेघांपरी ते वर्षताना… मंदिरी वाजेल घंटा अंतरीचा नाद तो माझा परंतू… आज मी नाहीच तेथे गोठल्या आकाशगंगा गारठ्याने… गोठला…

  • जमणार नाही- JAMANAR NAHEE ((it is not possible for me)

    काळजाशी बोलल्याखेरीज माझ्या… मौन हे माझे तुला कळणार नाही … काळजाला हात मी घालू कशीरे … काळजाला दुखविणे जमणार नाही … काळजाला चुम्बते मी पापण्यांनी… वार करणे भिजविणे रुचणार नाही सरळ कर तू वार मी हटणार नाही… दाद दे! हा हट्ट मी करणार नाही… दाद द्यावी लोचनांनी आसवांनी… हलविल्याविन काळजा हलणार नाही सर अता येऊन…

  • चिरी – CHIREE (line of vermilon_

    सुकुमार पाकळ्यांचे जाणून भाव काही रानातल्या फुलांचे घडवू जडाव काही लढण्यास आम जनता आहे तयार जेथे तेथे रणांगणी मी सोसेन घाव काही कुजणार संपदा ही येताच मोड त्याला मुलगी म्हणे पित्याला करते लिलाव काही भालावरी चिरी ती रेखून आज आली पाते तिला सुरीचे म्हणतात राव काही ज्यांच्यात हे पडोंनी होतात जायबंदी ते बुजाविण्यास खड्डे घालू…

  • सुगंध-लीला – SUGANDH-LEELA (divine play of aroma)

    रंगात रंगुनी मी जाणार पंचमीला समृद्ध फाल्गुनाच्या बघुनी सुगंधलीला कोकीळ तान घेता आंब्यावरी सुखाने वेळू बनात वारा गाईल संगतीला येई वसंत मित्रा भिजवावयास तुजला मिटवून टाक शंका सांगेल मैत्रिणीला अंगावरी सरी घे होण्यास चिंब पुरते झरतील प्रेमधारा मातीत पेरणीला मृदगंध कोंडलेला वार्यासवे निघाला मी दूत प्रेमिकांचा सांगेल साजनीला वृत्त – गा गा ल गा, ल…

  • युद्ध – YUDDHA (battle)

    रणांगणावर युद्ध पेटले गळे इथे अवरुद्ध जाहले विशाल पर्वत गर्द पाहुनी किती दिसांनी बुद्ध हासले हिमालयावर बर्फ फोडण्या करीत तांडव वृद्ध  नाचले पिढी जुनी बरबाद जाहली तरूण सारे क्रुद्ध जाहले जळून जाता क्षार तापुनी निळे सरोवर शुद्ध भासले वृत्त – ल गा ल गा गा, गा ल गा ल गा.

  • स्वप्न नवे – SWAPN NAVE (new dream)

    तुज पाहते तुज ऐकते मज एवढेच कळे प्रिया मनी मानसी खग गातसे उबदार कंठ वळे प्रिया पडताच स्वप्न नवे निळे दव प्राशुनी खिरते निशा हसऱ्या उषेस पहावया नयनात डोह तळे प्रिया घन सावळा गगनी फिरे चमके नभी बिजली जरी हृदयात प्रीत जपावया भय सोड तू सगळे प्रिया उचलायचा न मला अता नच रिक्त वा भरला…