एकदा – EKADA


हे खरे की बरे सांगना एकदा
जे नकोसे तुला टाळना एकदा

ऐकताना नको अर्थ खोदू असे
कीस पाडायचे सोडना एकदा

दे मला तू तुझी सर्व स्वप्ने जुनी
केशरी रंग तिज फासना एकदा

ओळखीचे कुणी भेटले हासले
गाळुनी भाव तो बोलना एकदा

आणली मी फुले पाकळ्या चांदण्या
खेळ तो साजरा मांडना एकदा

वृत्त- गा ल गा, गा ल गा, गा ल गा, गा ल गा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.