-
पदर मलमली मायेचा – PADAR MALMALI MAAYECHAA
पातळ अथवा साडी लुगडे पदर मलमली मायेचा नऊवार वा सहावार रे पदर मलमली मायेचा मोरपिसे साडीवरची मम रांगोळीतुन अवतरता अडखळते अन मी सावरते पदर मलमली मायेचा ऊनपावसामध्ये घेता शिरी लपेटुन पदराला सुकती भिजती मोरपिसारे पदर मलमली मायेचा अलामतीवर डे रे ते ये किनार भगवी नाजुकशी रदीफ घनसर गडद काफिये पदर मलमली मायेचा जमीन आई धरा…
-
गुडघे – GUDAGHE
ढोपर घोटे गुडघे काळे अवयव घासुन अवघे काळे उगाळून कातळी कोळसा जे झाले ते कर घे काळे पोकळीत तू जरी राहशी ये बाहेरी धन घे काळे कर्मनिर्जरा करावयाला अंबरातले घन घे काळे कुठल्याश्या स्वर्गातुन उतरुन भूमीवरले फळ घे काळे
-
गझलमणी – GAZAL MANEE
जादुगार सोन्यासम पिवळा,करांगुलीवर नीलमणी.. खरा दागिना हेमंताचा,झळाळणारे शील मणी… सोन्याचे मी मणी गुंफिता,जुन्याच धाग्यामधे पुन्हा.. कनक मण्यांच्या माळेमध्ये,झाले नव सामील मणी … गळ्यात काळी पोत मण्यांची,मोजले न मी मणी जरी… अजून कांही आले तेंव्हा,करण्यासाठी डील मणी… आई माझी शिरोमणी जणु ,कधी न गळले अश्रु तिचे… मोरपिसांसम मायेच्या मज,तिच्या सयी सच्छील मणी… स्फटिक मण्यांची माळ जपाची,मणी…
-
जेली – JELEE
रांधली स्वतः मी कवठ गुळाची जेली कणकेस भिजवुनी निरांजने दो केली सुकवून तयांना दिवे तेवता दारी थरथरली पर्णे आम्रतरूची सारी
-
चारोळी बाई – CHAROLI BAI
चारोळी बाई झर ओळी बाई अंगणी काढते रांगोळी बाई पुरणास वाटून कर पोळी बाई विकाया बिब्ब्यास फिर बोळी बाई उरकून टाक तू अंघोळी बाई घामाने भिजली धू चोळी बाई शिमग्यास सुनेत्रा कर होळी बाई
-
जहाल साकी – JAHAAL SAAKEE
चहूकडे चाललीय घाई सुधारण्याची स्वतःस आता कुणी न बघते कसे फुलांच्या जपायचेरे मनास आता अता सुखाने लिहीत आहे असेच काही मने फुलाया खुडून काटे म्हणेन हृदया उधळ उधळ तू सुवास आता जुनाट कर्मावरी उतारा मलाच देते जहाल साकी तयांस प्राशुन झरझर लिहिते मुळी न थारा भयास आता भिजून भिंती दवारल्यावर जुने नवे पोपडे निघाले करुन…
-
सुंदरता – SUNDARTAA
मोर नाचतो नाचनाचतो भूमीवरती राजहंस पण जळी विहरतो भूमीवरती राजहंस वा मोर असूदे जीवच दोघे सुंदरतेला जीव जाणतो भूमीवरती